Join us

पहिल्यांदाच आवडत्या भूमिकेविषयी मिलिंद गवळी झाले व्यक्त; अमिताभ बच्चनचं उदाहरण देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:54 AM

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवरसांमधील वीर रसाविषयी भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. आजवरच्या कारकिर्दीत मिलिंद गवळी यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेच्या माध्यमातूनही त्यांनी बरीच लोकप्रियता मिळवली. मिलिंद सोशल मीडियावर सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात.मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून ते कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात ते बऱ्याचदा त्यांच्या एखाद्या चित्रपटाविषयी वा त्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होतांना दिसतात. यावेळी त्यांनी अभिनयातील त्यांच्या आवडत्या रसाविषयी सांगितलं आहे.

काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?

वीर रस” नवरसांमधला हा माझा सगळ्यात आवडता रस. “वीर रस” फार पूर्वी ज्या वेळेला सिनेमा व्हायचे त्या वेळेला, शृंगार रसावर, करूण रसावर, आधारलेले बरेचसे सिनेमे असायचे, मग त्या काळातले ही रोज म्हणजे ट्रेजडी किंग दिलीप, कुमार देवानंद, राज कपूर, राजेश खन्ना. फार मोजके सिनेमे वीर रसावर आधारलेले असायचे त्यात दारासिंग वगैरे हिरो असायचे. अमिताभ बच्चनचे नऊ पिक्चर चालले नाहीत आणि बहुतेक दहावा पिक्चर जंजीर होता ज्याच्यामध्ये त्याचा वीर रस लोकांच्या समोर आला. आणि, त्याचा प्राण साहेबांबरोबरचा पोलीस स्टेशन मधला सीन खुर्चीवर लाथ मारून जेवायला तो म्हणतो “ जब तक बैठने को कहा ना जाये शराफत से खडे रहो ये पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही “ angry young man म्हणून अमिताभ बच्चन instant Star झाला,असं मिलिंद गवळींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ते म्हणतात, "आमच्या शाळेत आम्हाला या वीर रसाचे सिनेमे फार आवडतं असे . शत्रुघ्न सिन्हा 'मेरे अपने'मध्ये “ आये तो केह देना छेनू आया था, बहोत गर्मी है खून में तो बेशक आये मैदान मे. आईंदा मेरे किसी भी लडके को हात लगाया तो मोहल्ले का मोहल्ला उडा दुंगा". किंवा राजकुमारचा डायलॉग “हमको मिटा सके ये जमाने मे दम नही जमान खुद हमसे है हम जमाने से नही”. हे असे पिक्चर्स बघून मला शाळेतच असं वाटायचं की आपण पण त्यांच्यासारखं हिरो व्हायचं आणि आणि खलनायकाला बदडायचं असेच डायलॉग मारायचे. त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये वीर रसाचे जितके roles characters माझ्या वाटेला आले ते मी कधी सोडले नाहीत. मग तो 'मराठा बटालियन'चा अमर भोसले, दूरदर्शन मालिकेतला शहीद भगतसिंग, या व्हिडिओ मधला दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटातला श्याम, शशांक सोळंकी यांच्या “तू अशी जवळी रहा “ या मालिकेतला retired colonel अजय सावंतराव. आजही मला वीर रस साकार करायला आवडतो. वीरसातले सिनेमे पाहायला पण खूप आवडतं. त्यातले मला आवडलेले चित्रपट म्हणजे फरान अख्तर चा भाग मिल्खा भाग, विकी कौशल चा “”Uri”-“ ऊरी”, रसेल क्रोचा “ग्लॅडिएटर” प्रियंका चोप्राणी केलेला “मेरी कॉम”. मराठीत भा.जी. पेंढारकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज हा “छत्रपती शिवाजी” चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झाला आणि चंद्रकांत मांडरे त्यांचे धडाकेबाज व्यक्तिमत्त्व यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला लोकांना खूप आवडले. तुम्हाला असे वीर रसातले तुम्ही पाहिलेले चित्रपट आठवतायेत का ?

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनअमिताभ बच्चनसेलिब्रिटीसिनेमा