Join us  

'आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का?', मिलिंद गवळीची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:44 AM

मिलिंद गवळीने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वंच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळीने साकारली आहे. मिलिंद गवळी (Milind Gawali) सोशल मीडियावर सक्रिय असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

मिलिंद गवळीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आई कुठे काय करते मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने अनिरुद्ध या त्याच्या भूमिकेविषयी सांगितले आहे. तर मिलिंदने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मिलिंद गवळीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले की, अनिरुद्ध देशमुख एकामागे एका मागे एक चुका करत चाललाय, बारा-तेरा वर्षापूर्वी त्याच्या आयुष्याचं गणित चुकलं, त्याच्याकडून एक चूक झाली, ती अनिरुद्धला सुधारता आली असती का? आली असती तर अनिरुद्ध सारखा सुखी माणूस कोणीच नसतात, आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार ही सुखी राहिला असता,असं म्हणतात ना की एक खोटं लपवण्यासाठी १०० वेळा खोटे बोलावे लागते, तसंच आयुष्यात एक मोठी चूक केली की त्याच्या मागे तुम्ही शंभर चुका करत राहता. वेळीस जर ती चूक कबूल करून सुधारली नाही तर आयुष्याची फडफड होऊ शकते,फक्त त्याची स्वतःची नाही तर त्याच्याबरोबर जोडलेल्या त्याच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची स्वकीयांची सगळ्यांची, किती घरांमध्ये हीच परिस्थिती आहे, मनं दुखावली जातात, काहींमध्ये अहंकार असतो.

'एकत्र कुटुंबासारखं सुख या जगात कुठेच नाही'

त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, लोकं स्वार्थी होतात, आणि मग त्याच्यावर एकच उपाय, उपाय म्हणजे , "त्यापेक्षा आपण वेगळे राहूया" आणि लोक वेगळी होतात, त्यात सगळ्यांचं नुकसान होतं, कळत नाही बऱ्याच लोकांना, एकत्र कुटुंब सारखं सुख या जगामध्ये कुठेच नाही, आई वडील आजी आजोबा मुली सुना नातवंड पतवंडं काका मावशी आत्या मामा आणि काही अतिशय जवळची मित्रमंडळी, हल्ली दिवाळीला सुद्धा एकत्र येत नाहीत. हे सगळं बदलेल का? येतील का लोक परत एकत्र छान सण साजरा करायला, दुरावलेली माणसं परत एकत्र आली किती मजा येईल, अनिरुद्ध देशमुख सुधारला तर किती मजा येईल? डोळे उघडतील का त्याचे? आशा ठेवूयात. मिलिंद गवळी.

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका