Milind Gawli: मिलिंद गवळी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. 'आई कुठे काय करते' मालिकेतील त्यांची अनिरुद्ध ही भूमिका चांगलीच गाजली. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते पोस्टमधून महत्त्वाचे मुद्दे मांडत असतात. आतादेखील त्यांनी एक परखड पोस्ट लिहिली आहे.
मिलिंग गवळी यांनी यंदाच्या 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५'साठी (Star Pravah Parivaar Puraskar 2025)स्वता:च खास ड्रेस डिझायन केलाय. तर ड्रेसवर त्यांनी साडीचा फेटा बांधून घेतला. याची माहिती त्यांनी पोस्ट शेअर करत दिली. यासोबत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्क्सी यांच्या भेटीवरही (Trump-zelensky Spat) भाष्य केलं. मिलिंग गवळी यांनी लिहलं, "स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ जो १६ मार्च संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या सोहळ्याला हजर राहण्यासाठी काय कपडे घालावेत हा एक मोठा प्रश्न पडला होता. शेवटच्या क्षणापर्यंत माझं "लग्नानंतर होईलच प्रेम" या मालिकेचे शूटिंग चाललं होतं. या वेळेला कुठलाही डिझायनर डोळ्यासमोर नव्हता/ गेली पाच वर्ष डिझायनरने बनवलेलेच कपडे घालत होतो आणि बऱ्याचदा मला ते आवडायचे नाहीत. तरी आपल्यासाठी त्यांनी बनवले आहेत म्हणून घालावे लागायचे, बरं मग फोटो काढा, रील टाका, त्यांना टॅग करा, हे आलंच, मग या वेळेला म्हटलं आपणच आपली डिझाईनर होऊया, स्टार प्रवाहच्या भव्यदिव्य event ला साजसे कपडे आपणच तयार करू, मग कळलं की सिल्वर & pearl ही theme आहे".
"लग्नानंतर होईलच प्रेम" च्या शूटिंगला dressman रंगा जाधव मला फेटा बांधत असे, त्याला म्हणलं स्टार प्रवाह इव्हेंट आहे. मला फेटा बांधशील का? तो आनंदाने हो म्हणाला, मग दिपाकडून तिची एक ब्लॅक सिल्वर साडी मागून घेतली. त्याचा बनवला फेटा आणि झाला माझा पारंपारिक western dresscode तयार. आणि मुख्य म्हणजे या वेळेला मी त्या कपड्यामध्ये comfortable होतो. पण मग असं वाटायला लागलं आपण overdressed झालो का? Dress to the occasion, Or Dress which makes You comfortable, Or Wear Simple ? माझ्यासाठी नेहमीच प्रश्न पडत असतो".
"या पोशाखावरून एक गोष्ट मनात राहिली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्क्सी यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली, त्यावेळेला झेलेन्सकींचा अपमान करण्यात आला होता. त्यादिवशी झेलेन्स्कीने युद्धकाळातील शैलीच्या अनुरूप एक साधा काळा पोशाख घातला होता. "तुम्ही या देशाच्या कार्यालयात सर्वोच्च स्तरावर आहात आणि तुम्ही सूट घालण्यास नकार देता" असं ब्रायन ग्लेन, मुख्य व्हाईट हाऊस प्रतिनिधीयाने विचारलं. झेलेन्स्की म्हणाले "हे युद्ध संपल्यानंतर मी पोशाख घालेन. कदाचित तुमच्यासारखे काहीतरी, हो. कदाचित काहीतरी चांगले, मला माहित नाही". जगातल्या मीडियासमोर झेलेन्सकीला अपमानित करून हाकलून दिलं. गेली तीन वर्ष रशिया सारख्या बलाढ्य देशाच्या तुलनेत छोटा देश युक्रेन लढतो आहे. त्या युक्रेनच्या नेत्याचा असा अपमान करणं योग्य आहे का? भारत ज्यावेळेला पारतंत्र्यात होता, त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य सैनिक, आणि नेत्यांचा पाश्चात्य देशात असाच अपमान झाला असेल का?" असं, मिलिंद गवळी यांनी लिहलं.