Join us

मिनी माथुर आणि सायरस साहूकार ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 8:00 PM

अभिनेत्री मिनी माथुर आणि अभिनेता सायरस साहूकार हे भारतातील सर्वात मोठा क्विझ शो डिस्कव्हरी स्कूल सुपर लीगचे सूत्रसंचालन करणार आहेत.

अभिनेत्री मिनी माथुर आणि अभिनेता सायरस साहूकार हे भारतातील सर्वात मोठा क्विझ शो डिस्कव्हरी स्कूल सुपर लीगचे सूत्रसंचालन करणार आहेत. जवळपास ४ वर्षांनंतर ते या क्विझ शोच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. 

याविषयी बोलताना अभिनेता सायरस साहुकार म्हणाला की, मी माझी खास दोस्त मिनी माथुरसोबत या क्विझच्या सूत्रसंचालनाबद्दल उत्सुक आहे आणि आम्ही दोघे मिळून ह्या शो ला मजेदार, रोमांचक आणि आकर्षक बनवू,  याचा आम्हाला विश्वास आहे.   

डिस्कव्हरी स्कूल सुपर लीगचा प्रीमिअर डिस्कव्हरी चॅनेल, डिस्कव्हरी एचडी वर्ल्ड, डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी किड्‌सवर २८ एप्रिलला होणार असून याचे एकूण ६ एपिसोड होणार आहेत. ह्या क्विझमध्ये २९ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली) च्या टीम्स भाग घेणार आहेत.

या मध्ये देशभरातील १२,३०० हून अधिक शाळांमधील ८ ते १४ वयोगटातील ४३ लाखहून अधिक विद्यार्थ्यांमधून केवळ ६० जण ह्या टीव्ही राऊंडपर्यंत पोहोचू शकले आहेत.

ह्या शोच्या निमित्ताने बोलताना मिनी माथूर म्हणाल्या, मला क्विझ खेळायला अतिशय आवडते आणि भारतातील मुलांची खरी छुपी ज्ञान क्षमता पडताळून पाहणाऱ्या ह्या शो चा हिस्सा बनताना मला अतिशय आनंद होत आहे. एका क्विझमास्टरची भूमिका जेवढी वाटते तेवढी सोपी नसते - मुलांना सहज आणि स्वाभाविक बनवण्याची आवश्यकता असते, म्हणजे ह्या शो च्या लखलखाटाने ते प्रभावित न होता त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर सुचायला हवे आणि खेळाची ऊर्जाही टिकून राहायला हवी. मी डिस्कव्हरी स्कूल सुपर लीगचा हिस्सा बनण्यासाठी उत्साही आहे कारण प्रत्येक राज्याची टीम शोधून काढण्याची प्रक्रिया खूपच व्यापक राहिलेली आहे आणि यापुढे होणारा मुकाबला देखील तेवढाच रोमांचकारी असेल. 

टॅग्स :शाळा