Join us

'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 1:39 PM

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अॅण्ड एण्टरटेनमेंट यांनी बहुप्रतिक्षित प्राइम ओरिजनल सीरिज 'मिर्झापूर'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे 'मिर्झापूर' नऊ भागांची मालिका 'मिर्झापूर' १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

 

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अॅण्ड एण्टरटेनमेंट यांनी बहुप्रतिक्षित प्राइम ओरिजनल सीरिज 'मिर्झापूर'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेतील कथा बळी तो कान पिळी हा न्याय चालणाऱ्या मिर्झापूर या मध्य भारतातील जागी घडते. ही कथा अमली पदार्थ, शस्त्र आणि सत्तेचे राजकारण याभोवती फिरणारी आहे. करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांची निर्मिती असलेली व गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलेली 'मिर्झापूर' ही नऊ भागांची मालिका १६ नोव्हेंबरपासून २००हून अधिक देश तसेच प्रदेशात केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केली जाणार आहे. 

प्रेक्षकांना सावरून बसायला लावणारा तरीही खिळवून ठेवणारा अनुभव देणारी मिर्झापूर म्हणजे नावाजलेल्या तसेच पुरस्कार विजेत्या अभिनेत्यांनी प्रत्यक्षात आणलेली पकड घेणारी कहाणी आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, विक्रांत मेसी, दिव्येंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, रसिका दुगल यांच्यासह अनेक कलावंतांचा समावेश आहे.

एक्सेल मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंटचे फरहान अख्तर म्हणाले, 'पुढील प्राइम ओरिजनल सीरिज 'मिर्झापूर'च्या निमित्ताने पुन्हा एकदा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत काम करण्याचा अनुभव रोमांचक आहे. इनसाइड एजच्या यशामुळे भारतातील डिजिटल स्ट्रीमिंगबद्दल आम्हाला वाटणारा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गोष्टी सांगणाऱ्यांसाठी कलावंतांसाठी, लेखकांसाठी आणि चित्रपटनिर्मात्यांसाठी हा काळ नक्कीच उत्साह वाढवणारा आहे. मिर्झापूर ही कथा कमकुवत हृदय असलेल्यांसाठी नाही आणि ही बघून झाल्यानंतर अनेक दिवस ही मालिका प्रेक्षकांच्या डोक्यातून जाणार नाही.'

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजश्वेता त्रिपाठीश्रिया पिळगावकर