Urfi Javed : उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनसाठी जास्त ओळखली जाते. लोकांचे लक्ष वेधून घेण्यात ती चांगलीच यशस्वी झाली आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी तर तिच्यावर प्रतिक्रिया दिल्याच आहेत. आता तर थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेतच तिची स्टाईल कॉपी करण्यात आली आहे. उर्फी टाकाऊ पासून टिकाऊ असलेले ड्रेस अनेकदा घालते आणि ट्रोल होते. मात्र मिस थायलंडने सुद्धा स्पर्धेत उर्फीसारखाच ड्रेस घातल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच 'मिस युनिव्हर्स २०२२' च्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या 'आर बोनी गॅब्रिएल'ने मिस युनिव्हर्स चा ताज जिंकला. या स्पर्धेत 'मिस थायलंड अण्णा सुएंगम'ने टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेला ड्रेस परिधान केला होता. तिचे आईवडील कचरा वेचायचे. यातूनच प्रेरणा घेत तिने हा ड्रेस बनवून घेतला. 'कॅन टॅब'असे या फॅशन स्टाईलचे नाव आहे.
गंमत म्हणजे ही स्टाईल याआधीच उर्फीने केली आहे. कॅन्सच्या झाकणापासून तिने बनवून घेतलेल्या टॉपचा तिचा व्हिडिओ व्हायरल होतो. मिस युनिव्हर्सने तर उर्फीचीच कॉपी केली असेही आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
उर्फी जावेद सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही तर तिच्यावरुन राजकारणही तापलेले आहे. उर्फी मात्र कशीचीच चिंता न करता बिंधास्त हवे तसे कपडे घालून फिरते. आता हा उर्फी आणि इतरांमधील हा वाद नक्की कुठपर्यंत जातो हे बघणे महत्वाचे आहे.