डान्स इंडिया डान्समध्ये मिथुन चक्रवर्तीसाठी एका स्पर्धकाने आणली ही खास वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 7:33 AM
‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर ...
‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत असून आता कोणता स्पर्धक बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती प्रेक्षकांना ग्रॅण्डमास्टरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.‘डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये बाद झालेले सगळेच स्पर्धक येत्या आठवड्यात पुन्हा आपला दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. दीपक हुलसुरे, नैनिका अनासुरू, पुण्यकर उपाध्याय आणि अल्फोन्स चेट्टी हे अंतिम दहा स्पर्धक कार्यक्रमामध्ये स्थान मिळविण्यासाठी आव्हानवीर बनून येणार आहेत. लातूरच्या दीपक हुलसुरेने यावेळी अप्रतिम नृत्यकौशल्याचा नमुना सादर करून ग्रॅण्डमास्टर मिथुनदांवर आपला प्रभाव टाकला. नृत्य सादर केल्यानंतर दीपकने आपल्या आयुष्याविषयी काही गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. दीपकचे पालक हे गरीब शेतकरी आहेत. आपल्याला या कार्यक्रमाने इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मंचावर संधी दिली आणि त्यामुळे जो मान दिला, त्याबद्दल दीपकने ‘डान्स इंडिया डान्स’चे आभार मानले. आपल्या मुलाला इतक्या भव्य मंचावर नृत्य सादर करताना पाहून दीपकचे पालकही आनंदित झाले. इतकेच नव्हे, तर त्यांनी मिथुन चक्रवर्तीला खास घरी बनविलेली भाकरी भेट म्हणून दिली. मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी आपण स्वत: ही भाकरी बनविली असून त्यांना आपल्या हाताने ही भाकरी खाऊ घालण्याची आपली इच्छा असल्याचे सांगून त्यांनी मिथुन चक्रवर्तीला मंचावर येण्याची विनंती केली. त्यांच्या या आपलेपणाच्या आणि प्रेमाच्या भावनेने मिथुन चक्रवर्ती भारावून गेला आणि त्याने अस्सल मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली भाकरी आपल्यासाठी ‘डान्स इंडिया डान्स’च्या कार्यक्रमात आणल्याबद्दल दीपकच्या पालकांचे आभार मानले. या कार्यक्रमात स्पर्धक दफिशाने ‘आज जाने की जिद ना करो’ या गाण्यावर नृत्य सादर करून या भागाचा प्रारंभ केला. नंतर आव्हानवीर पुण्यकर आणि दीपकने अतिशय बहारदार नृत्य सादर करून मास्टर आणि ग्रॅण्डमास्टर यांना प्रभावित केले. दुसरी आव्हानवीर नैनिकाने ‘रोझाना’ या गाण्यावर अद्भुत नृत्य सादर करून सर्वांना चकित करून सोडले. अल्फोन्सने ‘हुकुम का इक्का’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले.Also Read : रिंकू राजगुरूचे हे स्वप्न झाले पूर्ण