Join us

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी दुसऱ्यांदा प्रेग्नंट, हटके पद्धतीने शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:12 IST

Mohena Kumari second pregnancy: मोहिना कुमारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोहिना कुमारी (Mohina Kumari) दुसऱ्यांदा गरोदर आहे. पुन्हा एकदा तिच्या घरी पाळणा हलणार आहे. मोहिनाने नुकतंच बेबी बंप दाखवत प्रेग्नंसीची घोषणा केली. त्यामुळे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मोहिना रॉयल कुटुंबात जन्माला आली असून तिने बिझनेसमन सुयश रावतसोबत लग्नगाठ बांधली. २०२२ मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. तर आता ती पुन्हा एकदा मातृत्व अनुभवणार आहे.

मोहिना कुमारीने हटके पद्धतीने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 'जब वी मेट' सिनेमातील 'आओगे जब तुम' गाण्यावर क्लासिकल डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यासोबत तिने लिहिले, 'मी माझ्या गेल्या प्रेग्नंसीवेळी हे गाणं ऐकायचे. अयांशच्या जन्माची वाट पाहत मी हीच आशा करायचे की या गाण्याप्रमाणेच तू आल्यानंतर सगळं काही चांगलं होणार आहे. मुलाच्या जन्मानंतर मला गाण्याचे बोल आणखी समजू लागले. अयांश आमच्या आयुष्यात आला आणि आमचं जगणं अजूनच सुंदर झालं. मी या शब्दांना पुन्हा एकदा जीवंत करत आहे कारण मी नवा आनंद येण्याची वाट पाहत आहे.'

मोहिनाने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी बिझनेसमन आणि पॉलिटिशियन सुयश रावतसोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंड कॅबिनेट मिनिस्टर सतपाल महाराज यांचा तो मुलगा आहे. १५ एप्रिल २०२२ रोजी मोहिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला. आता दोन वर्षातच तिच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. 

मोहिनाने २०१२ साली 'डांस इंडिया डांस' शोमध्ये सहभाग घेतला होता. ती उत्तम डान्सर आहे. यानंतर 'स्टुडंट ऑफ द इयर', 'डेढ इश्किया', 'ये जवानी है दीवानी' सिनेमांसाठी ती असिस्टंट कोरियोग्राफर होती. 2015 साली तिने 'दिल दोस्ती डान्स' मधून अभिनय सुरु केला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिला लोकप्रियता मिळाली.  

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटिव्ही कलाकारप्रेग्नंसीसोशल मीडिया