निकलोडियनचे मोटु पतलु (Motu Patlu) हे भारतातले सर्वात लोकप्रिय टुन आयकॉन्स आहेत. २०१२ मध्ये शो सुरू झाल्यापासून या व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे आणि प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. एक हजारहून जास्त गोष्टी, ५६० एपिसोड्स, २५ सिनेमे आणि अँड्रॉइड व आयओएसवर वीस हून जास्त गेम्स यांसह मोटु पतलुने गेल्या दशकभरात भारतात तयार झालेल्या टुन्सच्या क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत सर्वांना मोटु पतलु आपलेसे वाटतात आणि प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे. आज मोटु पतलुला निकलोडियनवर सर्वोच्च स्लॉट असून त्यांचे देशभरात २८९ दशलक्ष प्रेक्षक आहेत, जे ७ वेगवेगळ्या भाषांत हा शो पाहातात.
मोटु पतलुचा प्रवास २०१२ मध्ये सुरू झाला आणि तेव्हा या व्यक्तीरेखा जिवंत झाल्या. या व्यक्तीरेखा कॉस्मॉस मायासह प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्या होत्या. लाँचवेळेस भारतातील लहान मुलांसाठीच्या मनोरंजन क्षेत्रात भारतीय व्यक्तीरेखा आणि गोष्टी दाखवण्याची प्रचंड गरज होती. निकलोडियनने मोटु पतलुची सुरुवात करत ही उणीव भरून काढली. या व्यक्तीरेखा लोटपोट कॉमिक्समधील प्रसिद्ध व्यक्तीरेखांवरून प्रेरित होत्या. सुरुवातीला शो याच कॉमिकवर आधारित होता आणि त्याचे एपिसोड्स मर्यादित होते. मात्र, प्रेक्षकांनी या शोला पसंती दिली आणि बाकी सगळा इतिहास आहे.
मोटु पतलुची गोष्टच अशी आहे, की प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना काहीतरी खास संदेश दिला जातो. हे संदेश साहस, मैत्री, सामाजिक समस्या अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित असतात. विशेष म्हणजे, मोटु पतलुच्या व्यक्तीरेखांचे आपलेपण हे केवळ मुलांपुरतं किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरते मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या पिढ्यांचे, सीमेपार राहाणारे लोक यांनाही मोटु पतलुची ही अॅनिमेटेड जोडी टवटवीत वाटते. तरुण मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मोटु पतलुची गोष्ट यशस्वी ठरली असून ते आनंद व मनोरंजनाचा खजिना बनले आहेत. या सगळ्याच्या मिश्रणातून मोटु पतलु भारतातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी आयपीजपैकी एक झाले आहेत.
मोटु पतलु दर आठवड्यागणिक या विभागातल्या पहिल्या पाच शोमध्ये आपले स्थान टिकवून आहे. डिजिटल वितरणानंतर हे यश आणखीनच वाढले आहे. निकलोडियनची ही धमाल जोडी मेणाच्या पुतळ्याच्या रुपात मादाम तुसां, दिल्लीमध्ये समाविष्ट झालेल्या पहिल्या भारतीय अॅनिमेटेड व्यक्तीरेखा आहेत. मोटु पतलुवर प्रेक्षकांचं अतोनात प्रेम आहे आणि त्यांची लोकप्रियता अफाट आहे. दहा वर्षांनंतरही ते प्रेक्षकांच्या हृदयात वसलेले आहेत आणि त्यांना आजही आपलेसे वाटतात. चाहते आणि प्रेक्षक आगामी काळातही मोटु पतलुचं साहस पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.