मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दोघांनी गोव्यात मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. मौनी आणि सूरजच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. हळदी आणि मेहंदीनंतर चाहते दोघांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत होते. मात्र, चाहत्यांची ही प्रतीक्षाही संपली आणि नववधू बनलेल्या मौनी रॉयच्या लग्नाची पहिली झलक (Mouni Roy Wedding First Photo) चाहत्यांपर्यंत पोहोचली. लग्नाच्या मंडपातून वधू-वरांचे पहिला फोटोसमोर आले आहे.नववधू बनलेली मौनी पारंपारिक साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
लग्नाचा पहिला फोटो मौनीचा मित्र अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये मौनी आणि सूरज मंडपात उभे आहेत. मौनी रॉय दक्षिण भारतीय वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे.
कोण आहे सूरज नांबियार?मौनीच्या प्रियकराचं नाव सूरज नांबियार असं असून तो एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली.