कलर्स मराठीवरील “अस्सं सासर सुरेख बाई” या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानीसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि तिने पुन्हाएकदा प्रेक्षकांची मने जिंकले. “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” या मालिकेतील “अनु माझ्यासाठी सगळ्यात जवळची आणि महत्वाची भूमिका आहे. “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” या मालिकेतील अनुची भूमिका साकारणारी आपल्या सगळ्यांची लाडकी मृणाल दुसानीस मालिकेमधील तिच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली मी खूप आनंदी आहे, कि मला अनु सारखी भूमिका साकारायची संधी मिळाली. खूप माझ्यासारखी आहे, जी खूप कष्टाळू आहे, मनाने खूप चांगली आहे, पण तिच्या कुटुंबाविषयी कोणी काही बोल किंवा तिच्या परिवारावर कुठल संकंट आलं तर त्यावर मात करणारी त्यांच्यासाठी धावून जाणारी ती मुलगी आहे. तिचं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे...तिची सासू देखील हे पात्र खूपच छान आहे, अत्यंत सुंदर प्रकारे ते मांडल आल आहे मालिकेमध्ये. प्रेक्षकांना देखील हे पात्र खूप आवडत आहे, त्यामुळे मी खुश आहे. इतकेच नसून तिने वंदना ताई आणि शशांक बरोबर खूप छान मैत्री झाली आहे. शशांक बरोबर मी पहिल्यांदाच काम करते आहे, त्यामुळे पहिले जरा दडपण होतं, कसा असेल शशांक, काम करताना कोणत्या गोष्टी बदलाव्या लागतील असे अनेक प्रश्न पडले होते... पण तो अतिशय चांगल्या स्वभावाचा, आत्मविश्वासाने काम करणारा मुलगा आहे. कि... पण तो खूप साधा मुलगा त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल आहे त्याच्यासोबत काम करताना... वंदना ताई सोबत काम करण्याची पहिले थोडी भीती वाटली होती. पण हळूहळू त्या कळत गेल्या ... सेटवर सगळ्यांची खूप काळजी घेतात, खूप फ्रेंडली आहेत, सेटवर त्या आमच्या वयाच्या होऊन त्या आमच्याशी वागतात, बोलतात. आमच्या सेटवर सगळेच खूप छान, गोड आहेत त्यामुळे सगळ्याच सह कलाकारांसोबत काम करताना मजा येते.
तसेच, आजपर्यंत मी जे काही करत आले आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळ करण्याची इच्छा आहे. मला आता मालिकांव्यतिरिक्त काम करायला आवडेल. मला नाटकात काम करण्याची मनापासून इच्छा आहे. कारण मी सुरुवातच प्रायोगिक रंगमंचापासून केली होती. त्यामुळे मला पुन्हा एकदा नाटक करण्याची इच्छा आहे. आणि सिनेमा मला मिळाला तर नक्कीच करायला आवडेल.