Join us

गोंडस लेकीसोबत मृणाल दुसानिसनं पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 07:00 IST

Mrunal Dusanis: मृणालने ती, तिचा पती निरज आणि नुर्वी असा तिघांचा एकत्र असा पहिल्यांदाच फोटो शेअर केलाय.

अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही माझीया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. मृणाल काही महिन्यांपूर्वी आई झाली आहे. मृणालच्या लेकीचं नाव नुर्वी असं आहे. मृणाल सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून ती नुर्वीचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता मात्र मृणालने पहिल्यांदाच गोंडस नुर्वीसोबत फॅमिली फोटो शेअर केला आहे.

नुकताच मृणालने ती, तिचा पती निरज आणि नुर्वी असा तिघांचा एकत्र असा पहिल्यांदाच फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये माझं संपूर्ण जग..!!! असं कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये नुर्वी खूपच गोड दिसत असून ती हुबेहुब मृणालसारखी दिसत असल्याचं दिसून येते आहे. या फोटोवर अभिनेत्री अक्षया नाईक हिने कमेंट करत, किती किती गोड अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवे आणि जुई गडकरीने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. 

मृणाल दुसानिस ही २४ मार्च २०२२ रोजी आई झाली. मृणाल सध्या तिचे आईपण एन्जॉय करते आहे. मृणालची लेक काही दिवसांपूर्वीच पाच महिन्यांची झाली आहे आणि नुर्वी पाच महिन्यांची होताच मृणालने नुर्वीचा एक गोड व्हिडीओ शेअर करत आणि बघता बघता आम्ही पाच महिन्यांचे झालो.. असं म्हंटलं होतं. नुर्वीचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

नुर्वी झाल्यापासून अनेकदा मृणालने तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मृणालचा नवरा निरज हा परदेशात नोकरी करत असल्याने सध्या ती परदेशात आहे. मृणालने नुर्वी दोन महिन्यांची झाल्यानंतर लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. मृणाल सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती नुर्वीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तसंच नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

टॅग्स :मृणाल दुसानीस