Join us

MTV लव स्कूल फेम जगनूर अनेजाचं निधन; टेलिव्हिजन क्षेत्रावर पुन्हा पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 4:12 PM

जगनूर अनेजा मिस्त्र इथे फिरण्यासाठी गेला होता. बुधवारी जगनूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या भटकंतीचे व्हिडीओही शेअर केले होते.

नवी दिल्ली – अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यानंतर पुन्हा टेलिव्हिजन क्षेत्रात आणखी एक दु:खदायक बातमी आली आहे. MTV लव स्कूल फेम जगनूर अनेजा याचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मिस्त्रमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. सुशांत सिंग राजपूत आणि सिद्धार्थ शुक्लानंतर आणखी एका अभिनेत्याने कमी वयाने या जगाचा निरोप घेतल्याने शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगनूर अनेजा मिस्त्र इथे फिरण्यासाठी गेला होता. बुधवारी जगनूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या भटकंतीचे व्हिडीओही शेअर केले होते. सोशल मीडियावर जगनूर मिस्त्र पिकनिकचे फोटो वारंवार अपलोड करायचा. त्याने रिल व्हिडीओही शेअर केला होता. ज्यात मिस्त्र येथील नैसर्गिक ठिकाण आणि तेथील पिरॅमिंड दाखवताना तो दिसला होता. या व्हिडीओत जगनूर एकदम फिट अँन्ड फाइन वाटत होता. परंतु त्याच्या निधनानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पिरॅमिंडसह पोज देताना रिल व्हिडीओत जगनूरनं कॅप्शन लिहिलं होतं की, एक स्वप्न सत्यात उतरलं जेव्हा मी गीजाच्या महान पिरॅमिंडला पाहिलं. माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. परंतु कुणाला माहिती होतं जगनूरची ही शेवटची ट्रीप ठरेल. आता त्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. जगनूरच्या निधनाच्या बातमीनं त्याचे चाहते, कुटुंबातील आणि सेलेब्स यांना धक्का बसला आहे. कुणालाही जगनूरच्या निधनावर विश्वास बसत नाही.

कोण आहे जगनूर अनेजा?

जगनूर हा एमटीव्ही(MTV) वरील लव स्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धक आहे. जगनूर त्याची एक्स गर्लफ्रेंड मोनिकासोबत नात्यातील अडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रमात भाग घेतला होता. परंतु त्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही आणि दोघांचे ब्रेक अप झाले. शो मधील आणखी एका स्पर्धकाने जगनूरच्या लैंगिक जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तो गे असल्याचं म्हटलं होतं. सिद्धार्थ शुक्ला याचा अलीकडेच मृत्यू झाला होता. वयाच्या ४० व्या वर्षी त्याला ह्दयविकाराचा झटका आल्यानं निधन झालं होतं. त्यानंतर आता जगनूर जो फिरण्यासाठी ट्रीपला गेला होता त्याठिकाणीच त्याला ह्दयविकाराचा झटका येऊन निधन झालं आहे.

टॅग्स :एमटीव्हीटेलिव्हिजन