'सारेगमप लिटिल चॅम्प्स' कार्यक्रमाच्या माध्यमातून मुग्धा वैशंपायन नवीन भूमिकेत झळकत आहे.तब्बल १२ वर्षानंतर लिटील मॉनिटर म्हणून ओळखली जाणारी मुग्धाला पुन्हा टीव्हीवर झळकत आहेत. त्यामुळे तिला आता इतर चिमुरडे स्पर्धकांना जज करताना पाहणेही रसिकांसाठी वेगळीच उत्सुकतेचा भाग बनला आहे. मुग्धाही सोशल मीडियावर सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे वेगवेगळे गाण्याचे व्हिडीओ शेअर करत रसिकांची पसंती मिळवत असते. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
या व्हिडीओत मुग्धा गाताना दिसत नाही तर चक्क गावातल्या विहीरीत उडी मारत पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमची खानावची विहीर आणि त्यात उडी मारण्याचा आनंद अशी कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही धडकी भरली असणार. सावध राहण्याचेही तिला चाहते सांगताना दिसत आहे.
तर काही चाहते तिच्या या धाडसाचे कौतुक करताना दिसत आहे. सैराट झालं जी अशी कमेंट करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.लहानवायातच इतकं मोठं यश मिळवून देखील मुग्धाने साधेपणा जपलाय असे बोलत तिचे कौतुक करताना दिसत आहे.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वातील टॅलेंटबद्दल मुग्धा सांगितले होते की, आम्ही टेक्नोसॅव्ही नव्हतो. त्यामुळं एखादा कलाकार स्वत:ला कसा प्रेझेंट करू शकतो याबाबत काही ठाऊक नव्हतं. सारेगमपनंतर जे काही केलं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे आम्हाला समजत नव्हतं. आताची जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना स्वत:ला प्रमोट कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं हे माहित आहे.
हे करताना त्यांचा गाण्यावरचा फोकस कमी होता कामा नये याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. यासाठी त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचे ताई-दादा बनून त्यांना समजावू. जज या भूमिकेत असलो, तरी ताई-दादाच्या नजरेतून आम्ही त्यांना जज करणार आहोत ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.