"‘मन उडू उडू झालं’ चांगलीच गाज आहे. सुरुवातीपासून मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.मालिकेची दमदार कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे मालिकाही रसिकांची आवडती बनली आहे. मालिकेप्रमाणे मालिकेतले कलाकारसुद्धा तितकेच आवडीचे बनले आहेत. या मालिकेमुळे अनेक कलाकारांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्राच्या बहिणीची म्हणजेच मुक्ताची भूमिका साकारणारी प्राजक्ता परबलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
मालिकेतली तिची भूमिकासुद्धा तितकीच लक्षवेधी ठरली आहे.तिच्याविषयी जाणून घेण्यातही तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. इतकंच काय तर सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. तिच्या खासगी जीवनातल्या घडामोडी तिने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यातूनच अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांना समजतात.
रिअल लाईफमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आहे. पारंपरिकपासून ते वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येक अंदाजात ती तितकीच सुंदर दिसते. विशेष म्हणजे याच वर्षी प्राजक्ताने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्राजक्ताचा पतीसुद्धा अभिनयक्षेत्रात मोठे नाव आहे. प्राजक्ता परब दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या अंकुश मरोडेची पत्नी आहे.९ जानेवारी २०२१ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले होते. इंडस्ट्रीत एक उत्कृष्ट दिगदर्शक म्हणून अंकुशनेही छाप पाडली आहे. 'ती परत आलीये' या मालिकेचे दिग्दर्शन अंकुश मरोडेच करत आहे.
मराठीसह हिंदीतही अंकुश प्रचंड प्रसिद्ध आहे. हिंदी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. 'सड्डा हक', 'लाल ईश्क', 'ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं' या हिंदी मालिका केल्या आहेत. सात वर्षे हिंदी मालिकेत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत असताना 'एक घर मंतरलेलं' या मालिकेतून त्याने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं. 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड', 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचं २० ते २५ दिवसाच काम करण्याची संधीही अंकुशला मिळाली होती.