मुंबईची मीनाक्षी–पलक ठरली ढोलकीच्या तालावरची विजेती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2017 7:27 AM
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामधील छोट्या अप्सरांनी त्यांच्या निरागस अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १२ प्रतिभावान आणि नृत्याची ...
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामधील छोट्या अप्सरांनी त्यांच्या निरागस अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १२ प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या जोड्यांमध्ये या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवण्यासाठी चुरस रंगली होती. शेवटच्या आठवड्यामध्ये या १२ जोड्यांमधून मीनाक्षी–पलक, धनश्री-अनुष्का, चिन्मयी–समृद्धी, समृद्धी–धनिष्ठा आणि ऋतुजा–ईश्वरी या पाच जोड्यांनी महाअंतिम सोहळ्यापर्यंत मजल मारली. या पाच जणांमधून मुंबईची मीनाक्षी–पलक ही जोडी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाची विजेती जोडी ठरली. या विजेत्या जोडीला एक गोल्डन ट्रॉफी तसेच तीन लाखांचा धनादेश देण्यात आला तर बाकीच्या चारही जोड्यांनी दुसरे स्थान पटकावले. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या सोहळ्याची सुरुवात पाच जोड्यांच्या उत्कृष्ट समूह नृत्याने झाली. वैशाली जाधव आणि मृण्मयी गोंधळेकर या ढोलकीच्या तालवर या कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वाच्या विजेत्यांनी अप्रतिम लावणीने प्रेक्षकांची तसेच परीक्षकांची वाहवा मिळवली. तर या कार्यक्रमाच्या मागील पर्वातील परीक्षक मानसी नाईक आणि दिपाली सय्यद यांनी आपल्या नृत्यातून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. तसेच शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर यांनी आपल्या नृत्याने महासोहळ्याची रंगत वाढवली. तर जितेंद्र जोशीने बम बम बोले, सुबह हो गई मामू या गाण्यांवर छोट्या अप्सरांबरोबर नृत्य सादर केले. सोनाली कुलकर्णीने अप्सरा आली तसेच बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा आणि दिवानी मस्तानी या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. ढोलकीच्या मंचावर महाअंतिम सोहळ्याच्या निमित्ताने “बालपण देगा देवा” मालिकेमधील आनंदी तिच्या आवडत्या अनुष्काला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी आली होती. आनंदी या कार्यक्रमात अनुष्कासोबत एका स्टेपवर थिरकताना देखील दिसली. पाचही जोड्यांमधून पलकच्या लै भारी अदाकारीने आणि मीनाक्षीच्या ठसकेबाज लावणीने परीक्षकांची मने जिंकली आणि महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्याचा मान पटकावला.Also Read : अमृता खानविलकर आणि उमेश जाधव यांनी दिली ढोलकीच्या तालावरच्या सेटला भेट