Join us

तारक मेहता का उल्टा चष्मातील बबिताचा भाऊ आहे अभिनेता, तारक... मध्ये दिसला होता या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 5:27 PM

मुनमुन दत्ताचा भाऊ अभिनेता असून त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केले आहे. तसेच तो काही चित्रपटांमध्ये देखील झळकला आहे.

ठळक मुद्देमुनमुनच्या भावाचे नाव दीपज्योती दास असून त्याने या मालिकेसोबतच काही चित्रपटांमध्ये काम केले होते. गोकुळधाममध्ये रिनोव्हेशन सुरू असताना तो इंटेरिअर डिझायनरच्या भूमिकेत दिसला होता.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेतील बबिताची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अतिशय स्टाईलिश असलेल्या या बबिताच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत बबिताची भूमिका मुनमुन दत्ता ही अभिनेत्री साकारत आहे.

 

तुम्हाला माहित आहे का, मुनमुन दत्ताचा भाऊ अभिनेता असून त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम देखील केले आहे. बबिताच्या भावाला आपल्याला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या काही भागांमध्ये पाहायला मिळाले होते. गोकुळधाम सोसायटीमध्ये रिनोव्हेशन केले जाते हे भाग तुम्हाला आठवत आहेत का? त्यावेळी इंटेरिअर डिझायनरच्या भूमिकेत तो दिसला होता. 

मुनमुनच्या भावाचे नाव दीपज्योती दास असून त्याने या मालिकेसोबतच काही चित्रपटांमध्ये काम केले होते. गोकुळधाममध्ये रिनोव्हेशन सुरू असताना एक इंटेरिअर डिझायनर प्रत्येकाच्या घराचे इंटेरिअर करून देतो असे दाखवण्यात आले होते. हा इंटेरिअर डिझायनर बबिताचा मानलेला भाऊ असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. या इंटेरिअर डिझायनरच्या भूमिकेत दीपज्योती झळकला होता. त्यावेळात या मालिकेच्या काही भागांमध्ये आापल्यला त्याला पाहायला मिळाले होते.

मुनमुनला अभिनयासोबतच फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास नेहमीच कुठे ना कुठे फिरायला जात असते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. मुनमुनने तारक मेहता का उल्टा चष्माच्याआधी काही चित्रपट, मालिकांमध्ये छोट्या, मोठ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला खऱ्या अर्थाने ओळख ही याच मालिकेने मिळवून दिली.   

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामुनमुन दत्ता