Join us

"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 4:59 PM

'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो.

Shashank Ketkar Video : 'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या आणि दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल तो परखडपणे आपलं मत मांडताना दिसतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीचं त्याने मुंबईतील फिल्म सिटीच्या बाहेर रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत मुंबई मनपाच्या कारभाकडे लक्ष वेधलं होतं. 

नुकताच सोशल मीडियावर शशांकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शशांक शूटिंगला जात असताना वाहतूक कोंडीमुळे त्याची गाडी तासभर एकाच ठिकाणी उभी होती. यावर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. कामावर जात असताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्याने सोशल मीडियावर याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

सोशल मीडियावर शशांकने या व्हिडीओद्ववारे प्रशासनाला टोला देखील लगावला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "मीरारोड आणि ठाण्याच्यामध्ये  लोणावळ्याचा फील येण्यासाठी ही योजना आखली आहे. खरं तर आपल्याला याचा अर्थच कळत नाही. सिग्नल चांगले लावून त्याचा खर्च वाढवण्यापेक्षा, रस्त्यात खड्डे आणि चुकीच्या मार्गांवरून येणाऱ्या गाड्या आणि नियमभंग यामुळे सिग्नलचं एक वेगळंच काम आपल्याकडून केलं जात आहे. ही दुरदृष्टी आपल्याच देशाकडे आहे. मला फार बरं वाटत आहे की,  सिग्नलचा खर्च वाचतो, खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकरचा खर्च वाचतो. केवढी वेगळी दृष्टी लागते या सगळ्या गोष्टींसाठी! या सर्वासाठी एक वेगळीच दृष्टी लागते. लोकांचा जीव, वेळ हे काय त्याला  फारसं महत्वाचं नाही. मला पण असं वाटतं आहे की माझी गाडी इथेच उभी करून मी शूटिंगला पोहचलं पाहिजे. कारण रात्री ९-१० वाजेपर्यंत या गाड्या काही येथून हलणार नाहीत". 

वर्कफ्रंट-

शशांक केतकर हा मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'होणार सून मी ह्या घरची',' हे मन बावरे' यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वेगवेगळ्या मालिका,नाटक तसेच चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :शशांक केतकरवाहतूक कोंडीठाणेसोशल मीडियासोशल व्हायरलटिव्ही कलाकार