Join us  

सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:31 PM

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली. सचिनसोबत आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय #sachintendulkar

'मुरांबा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता विपुल साळुंखेच्या आयुष्यात एक खास संधी मिळाली. ती म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची. विपुलला चितळेंच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहीरातीत सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली. विपुलने सचिनसोबत काम करण्याचा विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. काय म्हणाला विपुल बघा.

छोटीशी भूमिका तरीही अभिनय करायला तयार झाला विपुल 

विपुलने सचिन तेंडुलकरसोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "an Actor, तुमच्या कारकिर्दीत अशा काही भूमिका येतात ज्याचा स्क्रीन टाईम किंवा तुम्हाला त्यात किती डायलॉग्स आहेत हे महत्त्वाचं नसतं, महत्त्वाचं असतं ते फक्त ती भूमिका करण्यामागचं "इमोशन" आणि त्या इमोशनचं नाव आहे "दी सचिन रमेश तेंडुलकर"  ज्या दिवशी रणजीतदादाचा ह्या प्रोजेक्ट संदर्भात पहिल्यांदा फोन आला, तेव्हा त्याने मला आधीच क्लिअर केलं की विपुल कॅरेक्टर खूप छोटं आहे, डायलॉग ही एखादाच असेल पण तुझं काम सचिन तेंडुलकर सोबत आहे तर तू तयार आहेस का हा रोल करायला?"

विपुल पुढे लिहितो, "यापुढे रणजीत दादा जे काही बोलत होता, पैशांबद्दल कॅरेक्टर बद्दल, प्रोडक्शन बद्दल ते सगळं मला बॅकग्राऊंडला फेडआऊट होत असलेल्या म्युझिक सारखं वाटत होतं, आणि डोळ्यासमोरून अख्खं बालपण तरुणपण एखाद्या फिल्मच्या फ्लॅशबॅक सारखं जात होतं. अजून काय बोलू आणि किती व्यक्त हो कळत नाहीयेत्यादिवशी माझ्यासह अख्खं फेमस स्टुडिओ मंत्रमुग्ध झालं होतं.... मस्मराईज्ड एकदम. तीन तास सचिन तेंडुलकर सोबत होतो यार त्यांना अनुभवात होतो त्यांनी खांद्यावर हात ठेवला, हातात हात घेतला, मी काय करतो याबद्दल आपुलकीने चौकशी केली."

विपुल शेवटी लिहितो, "खरं सांगतो त्या दिवशी आम्ही शिवाजी पार्कातल्या वडापाव पासून ते मी सध्या करत असलेल्या मराठी मालिकेपर्यंत आमच्या गप्पा झाल्या and i was like अरे हा माणूस "National Treasure" ए यार तरी किती humble आणि down to earth आहे.... Well all i can say is, साक्षात देवाचा स्पर्श झालाय त्याचा सहवास लाभलाय मला ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने....!!!" असं लिहून पुढे विपुलने जाहीरातीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरजाहिरात