Join us

‘संगीत सम्राट’च्या कॅप्टन्समध्ये रंगणार सुरांचा महासंगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 09:48 IST

सर्व कॅप्टन्सनी त्यांच्या टीममध्ये ७ स्पर्धकांची निवड केल्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे खऱ्या कसोटीची. या आठवड्यात चारही टीम्समध्ये सुरांचा महासंगम प्रेक्षक अनुभवू शकतील.

ठळक मुद्देटीम राहुल विरुद्ध टीम सावनी आणि टीम अभिजीत विरुद्ध टीम जुईली असा सुरांचा सामना रंगणार

 झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वात स्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक आहेत. सर्व कॅप्टन्सनी त्यांच्या टीममध्ये ७ स्पर्धकांची निवड केल्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे खऱ्या कसोटीची.

या आठवड्यात चारही टीम्समध्ये सुरांचा महासंगम प्रेक्षक अनुभवू शकतील. टीम राहुल विरुद्ध टीम सावनी आणि टीम अभिजीत विरुद्ध टीम जुईली असा सुरांचा सामना रंगणार आहे. प्रत्येक टीम मधील स्पर्धक आपल्या विरुद्ध स्पर्धकासोबत असलेली जुगलबंदी जिंकला तर त्या टीमच्या गुणांमध्ये वाढ होईल. या आठवड्यात हरगुन एक लावणी गाऊन सर्वांची मने जिंकणार आहे तसेच नेहमीच परीक्षकांची दाद मिळवणार ४एम बँड देखील सगळ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सने चकित करणार आहे.