Must See: हॅपू सिंग ख-या आयुष्यात दिसतो असा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 6:21 AM
'भाभीजी घर पर है' मालिकेत शुभांगी अत्रे(अंगुरी भाभी),सौम्या टंडनने साकारलेली( अनिता भाभी),असिफ शेफ(विभूती नारायण) या भूमिकांप्रमाणे आणखी एक भूमिका ...
'भाभीजी घर पर है' मालिकेत शुभांगी अत्रे(अंगुरी भाभी),सौम्या टंडनने साकारलेली( अनिता भाभी),असिफ शेफ(विभूती नारायण) या भूमिकांप्रमाणे आणखी एक भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरतेय.ती भूमिका म्हणजे हॅपू सिंग. हॅपू सिंग ही भूमिका योगेश त्रिपाठीने ही भूमिका रंगवली आहे. त्याचं पोलिसाच्या ढंगात चालणं,बोलणं सारं काही मेजेशीर त्याने मांडल्यामुळे हॅपू सिंग सगळ्यांच्या लक्षात रहातो. आपल्या विनोदी ढंगात त्याने रसिकांवर आपली छाप पाडली आहे.हॅपू सिंग या भूमिकेमुळ अभिनेता योगेश त्रिपाठी आज रसिकांचा आवडता अभिनेता बनला आहे. योगेशला हा या रोल त्याच्या करिअरसाठी टर्निंग पाईंट ठरला आहे.गेल्या अनेकवर्षापासून केलेला केलेला स्ट्रगल आता कुठे कामी येत असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. केवळ ओळखच नाही तर या भूमिकेने योगेशला आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवले आहे. या भूमिकेअगोदर योगेशने अनेक वर्षे प्रोडक्शन हाऊसबाहेर 12-12- तास उभे राहून काढले आहेत.प्रत्येक अॉडीशिअन देत एक आज तरी संधी मिळेन याच अशेने अभिनयक्षेत्रात एंट्री केली असे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीने सांगितले.जवळपास दोन वर्षे स्ट्रगल केल्यानंतर योगेशला 2007 साली एक जाहिरात मिळाली.ही जाहिरातही फार लोकप्रिय झाली आणि त्यानंतर योगेशने जवळपास 67 जाहिरातीत काम केले.आज योगेश त्याच्या आयुष्यात आर्थिकदष्ट्या सेटल झालेला असला तरीही त्याच्यासाठी त्याचा खडतर प्रवास नेहमीच प्रेरणादायी ठरत असल्याचे त्याने म्हटले आहे.'भाभीजी घर पर है' ही मालिका इतर विनोदी मालिकांप्रमाणेच लोकप्रिय आहे.त्यात अंगुरी भाभीने आपल्या भूमिकेने लावलेला तडका रसिकांना चांगलाच भावतोय.त्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेचा चाहता वर्गाच्या संख्येत वाढ होत असून रोज नवीन नवीन रंजक वळण मालिकेत पाहायला मिळत असल्यामुळे रसिकही या मालिकेशी खिळुन राहतात.