Join us

"माझ्या लग्नाला सासरकडून कडकडून विरोध होता...", कुशल बद्रिकेनं सांगितला लग्नापूर्वीचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 09:34 IST

Kushal Badrike : कुशल बद्रिके सोशल मीडियावर सक्रीय असून अलिकडेच त्याने सत्य घटनेवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच कुशल सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असतो. बऱ्याचदा तो सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर सत्य घटनेवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर करत लिहिले की, ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासर कडून, कडकडून विरोध होता, मला कायम असं वाटत राहील की माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल . आता हे फोटोज हाती लागे पर्यंत मी ह्याच “गैर समजुतीत” होतो .

त्याने पुढे लिहिले की, हे फोटो मला मिळाले त्या क्षणी मी सुनयना कडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी” ? सुनयना मला शांतपणे म्हणाली की “ तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत.मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा “गैरसमज” संपूर्ण दूर झाला ! खरंच… टेक्नॉलॉजी काय विकसित झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत मार्केटमधे. (सुकून) @sanjaymandre तुझा कडचा कॅमेरा भारी आहे . 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या