Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका करतेय डाएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 07:15 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकतंच या मालिकेत ईशा केसकर हिची शनयाच्या भूमिकेत एंट्री झाली आणि मालिकेची रंजकता अजूनच वाढली.

ठळक मुद्देधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते सध्या फ्रुट डाएट करतेय

झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकतंच या मालिकेत ईशा केसकर हिची शनयाच्या भूमिकेत एंट्री झाली आणि मालिकेची रंजकता अजूनच वाढली. राधिका ही फक्त एक व्यक्तिरेखा राहिली नसून महाराष्ट्रातील समस्त महिलांसाठी ती एक आदर्श आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी बनण्याची प्रेरणा राधिका सगळ्यांना देते.

राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते सध्या फ्रुट डाएट करतेय. त्याबद्दल बोलताना अनिता म्हणाली, 'यंदा मी आणि माझी मैत्रीण श्वेता मेहंदळे उपवास असं नाही पण थोडा वेगळा विचार करत फ्रुट डाएट करायचा ठरवलंय. यंदा नवरात्रीचे ९ दिवस आम्ही पूर्णपणे फलाहार करणार आहोत. त्यामुळे इतर कुठलाही खाद्य न खाण्याचा आपोआप निर्धार झालाच आहे. अजून पर्यंत तरी यशस्वीपाने फ्रुट डाएट केलं आहे आणि पुढे दसऱ्यापर्यंत असंच कायम ठेवू. यामुळे आवडीचे पदार्थ समोर असूनही त्यावर कसं नियंत्रण ठेवायला हवं याचं आपसूकच शिक्षण मिळतंय. सोबतच त्यागाची भावना रुजण्यास याचा अधिक फायदा होणार आहे. आमच्या या निर्धाराला सेटवर उत्तम पाठींबा मिळत असून आमच्यासाठी खास फळं आणून देणं यापासून आमच्यासमोर चमचमीत पदार्थ खाणं हे प्रत्येकजण टाळत आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याक्षणी शरीराला त्रास होतोय असं जाणवेल त्यावेळी हा पण सोडू.'

 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको