Join us

'नमुने'मध्ये येत्या वीकेंडला सादर होणार ब्रॅण्ड न्यू ‘नमुना'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 5:11 PM

बबडू किंवा मामा मुरारीसारख्या त्यांच्या पुस्तकातून थेट आलेल्या ‘अतरंगी’ व्यक्तिरेखा आपण बघत आलो आहोत. 

छोट्या पडद्यावरील 'नमुने' ही मालिका अनेकांना सकारात्मक विचार करायला लावणारी असल्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. आख्यायिका होऊन गेलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा स्पर्श लाभलेली ही मालिका रसिकांना आयुष्यातील वास्तवाची झलक दाखवत असल्याने ते या मालिकेशी स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने जोडून घेऊ शकत आहेत. बबडू किंवा मामा मुरारीसारख्या त्यांच्या पुस्तकातून थेट आलेल्या ‘अतरंगी’ व्यक्तिरेखा आपण बघत आलो आहोत. 

पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या सर्वांच्या परिचयाच्या व्यक्तिरेखांपैकी एक- ‘दामू इस्त्रीवाला’ या वीकेंडला नमुनेमध्ये बघून प्रेक्षकांना विशेष आनंद होईल. एक दिवस,निरंजनचे त्याच्या सध्याच्या इस्त्रीवाल्याशी भांडण होते आणि आपल्या शब्दांवर ठाम राहण्यासाठी तसेच अहंकारामुळे तो त्याला काढून टाकतो.निरंजनला एक नवीन मनुष्य, दामू, सापडतो आणि तो त्याला काम देतो. दामू प्रसिद्ध आहे तो गायब होण्यासाठी, गिऱ्हाईकांचे कपडे परत न करण्यासाठी आणि ते लबाडीने वापरण्यासाठी. एवढेच नाही, तर दामूला स्वत:बद्दल आणि स्वत:च्या कामाबद्दल बढाया मारायलाही फार आवडते.दामूने पूर्वी केलेल्या कृष्णकृत्यांची माहिती नसलेल्या निरंजनला नंतर लक्षात येते की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. 

निरंजनला एका वार्षिक बैठकीला जायचे असते आणि त्यासाठी असलेल्या ड्रेस कोडप्रमाणे त्याला त्याचा विशिष्ट निळा सुट घालायचा असतो,तेव्हाच ही कथा एक रोचक वळण घेते.बैठकीचा दिवस उगवतो,तरीही निरंजनचा सूट दामूकडेच आहे आणि दामूचा अपेक्षेप्रमाणे पत्ता नाही.दामूची भूमिका केली आहे ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी. अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये रांगड्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. निरंजन या बैठकीला हजर राहू शकेल का? दामू इस्त्रीवाला त्याच्या सूटसह बेपत्ता झाला आहे का?नमुनेमधील आपल्या दामू इस्त्रीवाला या भूमिकेबद्दल नागेश भोसले म्हणाले, “सोनी सबच्या नमुनेचा भाग होता आले हे खरोखरच मला वरदान मिळाल्यासारखे आहे. पु. ल. देशपांडे यांच्या कथा वाचतच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यातील एक व्यक्तिरेखा मालिकेत साकारणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मी रंगवलेला दामू इस्त्रीवाला बघून प्रेक्षकांना आनंद मिळेल आणि ते पुलंच्या आठवणींना उजळा देतील अशी आशा वाटते.”