नायरा आणि कार्तिकचा घटस्फोट होणार आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:35 PM2018-07-12T16:35:53+5:302018-07-12T16:38:45+5:30

काहीही झाले तरी ये रिश्ता क्या कहलाता है मधील कायराच्या कथेने तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू फुलले आहे. ह्या जोडीची ताकद त्यांच्या एकमेकांसाठीच्या सातत्यपूर्ण पाठबळामध्ये आहे.

Naira and Kartik relationship Will end? | नायरा आणि कार्तिकचा घटस्फोट होणार आहे?

नायरा आणि कार्तिकचा घटस्फोट होणार आहे?

googlenewsNext
ठळक मुद्देनायरा आणि कार्तिक यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वच नातेसंबंध उत्तम पद्धतीने सांभाळले

तुम्ही त्यांच्या प्रवासाचा हिस्सा राहिलेले आहात, मग त्यांचा स्वित्झर्लंडमधील रोमांस असो, ग्रीसमध्ये ते एकमेकांसाठी अनोळखी बनणे असो, किंवा ते पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडणे असो. काहीही झाले तरी ये रिश्ता क्या कहलाता है मधील कायराच्या कथेने तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू फुलले आहे. ह्या जोडीची ताकद त्यांच्या एकमेकांसाठीच्या सातत्यपूर्ण पाठबळामध्ये आहे. आयुष्यात आलेल्या सगळ्‌या अडथळ्‌यांना त्यांनी एकत्र येऊन पार केले आहे. तुम्ही त्यांच्यासोबत हसलात, रडलात, त्यांची बाजू घेतलीत. त्यांची कथा तुम्हांला आपलीशी वाटली. ही कथा होती प्रेम, विश्वास, सामंजस्य आणि आदराची. पण प्रत्येकच दिवस आनंदी आणि प्रेमाने भरलेला असू शकत नाही. काही वेळा आयुष्यात उतारही येतात. नायरा आणि कार्तिक यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वच नातेसंबंध उत्तम पद्धतीने सांभाळले. पण तरीही आता आपण त्यांना घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना पाहणार आहोत. असे काय चुकीचे घडले? कार्तिक आणि नायरा घटस्फोट घेऊन एकमेकांपासून विभक्त होणार असताना त्यांचे भविष्य चांगले असेल एवढी आशाच केवळ आपण करू शकतो.

छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरू असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. २ जानेवरी २००९ पासून सुरू झालेली ही मालिका गेल्या नऊ वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. केवळ सर्वात जास्त काळ सुरू असलेली मालिकाच नाही तर या मालिकेने सातत्याने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. हा रेकॉर्ड झाल्याने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खूश होती.

Web Title: Naira and Kartik relationship Will end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.