Join us

Nakuul Mehta : 'इश्कबाज' फेम नकुल मेहताच्या 11 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल; पत्नीची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 11:04 AM

Nakuul Mehta Son Sufi Tests Positive For Covid 19 : लोकप्रिय अभिनेत्याच्या 11 महिन्यांच्या बाळाला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,379 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 124 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,82,017 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान अनेक नेतेमंडळींना तसेच बॉलिवूडमधील काही कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्याच्या 11 महिन्यांच्या बाळाला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता याला (Nakuul Mehta ) काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता नकुलची पत्नी जानकी मेहता आणि 11 महिन्यांचा मुलगा सूफी मेहता यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. जानकीने इन्स्टग्रामवर आपल्या मुलाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो रुग्णालयातील असून सूफीने सुपरमॅनचे कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. या लूकमध्ये तो खूप क्यूट दिसत आहे. मात्र या फोटोसोबत जानकीने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

जानकीने आपल्या पोस्टमध्ये "आम्हाला माहिती होतं की कधी तरी आपल्याला कोरोनाची लागण होणार आहे. पण गेल्या आठवड्यात जे काही झाले त्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. दोन आठवड्यांपूर्वी माझा पती नकुलला कोरोना झाला. त्यानंतर मला देखील कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. येत्या काळात कठीण परिस्थितीला समोरे जावे लागणार याचा अंदाज होता."

"दोन दिवसांपूर्वी सूफीला ताप येऊ लागला. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री आम्ही सूफीला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. माझा मुलगा कोविड आयसीयूमध्ये होता. माझा फायटर मुलगा कोरोनासोबत लढला. तीन दिवसांनंतर त्याचा ताप गेला आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याटेलिव्हिजन