'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून सर्वांना खळखळून हसवणारी लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao). एकीकडे विनोदी अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीची भावूक बाजूही आहे. नम्रता नेहमी तिचा लेक रुद्राज सोबतचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. रुद्राजची घरी कशी मजा मस्ती सुरु असते हे ती चाहत्यांना दाखवते. तसंच नाटकाच्या किंवा हास्यजत्रेच्या दौऱ्यासाठी जेव्हा लेकाला सोडून परदेशात जावं लागतं तेव्हा नम्रताची काय अवस्था असते हेही आपण पाहिलंच आहे.
नुकतंच नम्रताने सोशल मीडियावर रुद्राजसोबतचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तितकंच तिने तितकंच छान कॅप्शनही लिहिलं आहे. ती लिहिते,'तुझ्या चेहऱ्यावरचं हे गोड हसू पाहिलं की माझं आयुष्य वाढतं कारण मी घरी आल्यावर पळत येऊन दार उघडायचं आणि घरात पाऊल ठेवायच्या आधी घट्ट मिठी मारायची हा आता त्याने त्याचा बनवलेला नियम आहे त्यामुळे घरी जाण्याची ओढ लागते कधी एकदा तो हसरा चेहरा ती गोड मिठी अनुभवतेय असं होतं आई तू माझी favorite आहेस तू माझी आई आहेस असं तुझ्या नाजूक आवाजात ऐकलं की आई झाल्याचा अभिमान गर्व वाटतो I love you so much'
नम्रताचं लेकावर किती प्रेम आहे हे वेळोवेळी तिच्या पोस्टमधून दिसलंच आहे. नम्रता लवकरच 'एकदा येऊन तर बघा' सिनेमात झळकणार आहे. शिवाय ती 'कुर्रर्रर्र' या नाटकातही भूमिका साकारत आहे.