Join us

"पश्या… मला तुझा अभिमान" नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:00 IST

अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Namrata Sambherao: हास्यवीर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकर बरोबरचा फोटो शेअर केला. तिनं लिहलं, "अभिनंदन पश्या…मला तुझा अभिमान आहे. आपला दुसरा सिनेमा ‘चिकी चिकी बुबूम बूम’ हा चित्रपटगृहात अतिशय उदंड प्रतिसादात चालू आहे. काही भागात तर हाउसफुल्ल होतोय हे ऐकून खूपच भारी वाटतंय. कारण ‘अरे ते थिएटर हाउसफुल्ल झालंय, प्रेक्षक गर्दी करतायत’ हे ऐकायला आपले कान आसुसलेले असतात. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडतोय. ते चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटतायत आणि तोच आनंद तुझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे झळकतोय. जे, जे रसिक आमच्यावर प्रेम करतात त्यांना मी खात्रीने सांगू शकते दोन तास चेहऱ्यावर निखळ हास्य हवं असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. आपल्या कुटुंबासह, मित्रांबरोबर हा सिनेमा तुम्ही अजून जास्त एन्जॉय करू शकता".

"रसिकहो, नाटकाला तुम्ही जसा उदंड प्रतिसाद देता. तसाच उत्साह चित्रपटगृहात देखील आम्हाला बघायचा आहे. हाउसफुल्लच्या पाट्यांचा आनंद तुमच्यामुळेच अनुभवता येतो आणि अधिकाधिक उत्तम काम करण्याचा, तुमचं मनोरंजन करण्याचा उत्साहदेखील तुमच्यामुळेच निर्माण होतो. १७ कलाकार एका गोष्टीत गुंफले गेलेत, त्यात ते काय धमाल करू शकतात हे बघण्याची मज्जा तुम्हाला मोठ्या पडद्यावर लुटता येईल. त्यामुळे कळकळीची विनंती चित्रपटगृहात जाऊनच सिनेमा बघा. आपल्या चित्रपटाला भरभरून यश मिळावं या तुला सदिच्छा, असाच मोठा हो…खुश राहा आणि उत्तम कलाकृती बनवत राहा", असं तिनं म्हटलं. विशेष म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटात नम्रता संभेरावचाही कॅमिओ आहे.  

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावसेलिब्रिटी