सध्या अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या KBC 16 ची चांगलीच चर्चा आहे. बिग बी पुन्हा एकदा त्याच सळसळत्या एनर्जीत KBC 16चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 मध्ये यंदाही विविध सामाजिक स्तरांमधून आलेले स्पर्धक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहभागी झाले आहेत. KBC च्या नवीन पर्वात पहिल्यांदा १ कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारणारी नरेशी मीना ही स्पर्धक दिसून आली. परंतु १ कोटींच्या प्रश्नावर नरेशीने खेळ सोडला. कोणता होता हा प्रश्न.
हा होता १ कोटींचा प्रश्न
बुद्धिमत्ता आणि हुशारीच्या जोरावर नरेशी मीनाने KBC 16 मध्ये १ कोटींच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. केवळ ५० मिनिटांत पटपट उत्तरं देऊन नरेशीने ५० लाखांपर्यंत मजल मारली होती. यासाठी तिच्या वडिलांनीही कौतुक केलं होतं. पुढे नरेशीसमोर १ कोटींच्या प्रश्नाचं आव्हान होतं. हा प्रश्न होता की, लीला रो दयाल किसे हराकर विंबलडन टेनिस चैम्पियनशिप में एकल मैच जीतने वाली पहली भारतीय महिला बनीं? नरेशीने या प्रश्नाच्या उत्तराचा चांगला विचार केला. ती दोन ऑप्शनमध्ये काहीशी गोंधळल्यासारखी दिसली होती. नंतर तिने उत्तरावर ठाम नसल्याने रिस्क न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
हे होतं १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर
खेळ सोडताना नरेशीने या प्रश्नाचं उत्तर A ऑप्शनमध्ये असलेलं लोटी डोड निवडलं. परंतु हे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचं खरं उत्तर होतं ग्लेडिस साउथवेल हे होतं. नरेशी मीनाच्या आयुष्यातील संघर्ष फार मोठा आहे. तिला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. यासाठी प्रोटोन थेरपीची आवश्यकता असल्याने तिला २५ ते ५० लाखांची गरज होती. स्वतः बिग बींनी नरेशीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.