आनंदी राघवच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी वर्षाने हनीमूनचा प्लॅन केला. रमाच्या नाकावर टिच्चून आनंदी राघवसोबत हनिमूनला जायला निघते. एका ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर लक्षात येते कि पुढे जायला रस्ताच नाही, आनंदी हट्टाला पेटून राघवला चालत घेऊन पुढे जाते.
त्या ठिकाणावर पोहोचल्यावर नेटवर्क नसल्याने राघवची चिडचिड होते, राघव इकडे येऊनसुद्धा ऑफिसच्या कामातच असल्याने आनंदी रुसलेय. आनंदीला मनविण्यासाठी राघव बोटीची सफर प्लॅन करतो पण अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडतो.
आनंदी राघवला बुडण्यापासून वाचवते, बेशुद्ध अवस्थेतल्या राघवकडे ती मनातल्या भावना व्यक्त करते, त्याचवेळेस राघवचे डोळे उघडतात आणि तो सुद्धा आपल्या मनातल्या भावना आनंदी समोर व्यक्त करतो. या निमित्ताने तरी आनंदी आणि राघवचा सुखी संसार सुरु होईल की रमा पुन्हा आनंदीला खो घालेल हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे.