Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 04:30 PM2021-10-09T16:30:03+5:302021-10-09T16:30:28+5:30
नवरात्री निमित्ताने आई कुठे काय करते मालिकेत भोंडल्याचा खेळ रंगताना दिसणार आहे.
नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतात. नवरात्री निमित्ताने आई कुठे काय करते मालिकेत भोंडल्याचा खेळ रंगताना दिसणार आहे.
सध्या देशमुखाच्या घरात तणावाचे वातावरण असले तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचे ठरवले आहे. कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात. महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेच्या प्रसारीत झालेल्या भागात अरुंधतीने केलेले पोहे देशमुख कुटुंबीय खाताना दिसत आहेत. त्यावर अनिरुद्ध या पोह्याला अरुंधतीच्या हाताची चव असल्याचे म्हणतो. त्यावर आजी दरवाजाबाहेर बोट दाखवून तिकडे बघ असे म्हणते. त्यावेळी गौरीच्या बाल्कनीत तुळशीची पुजा करताना गौरी आणि अरुंधती दिसते. त्यानंतर संजना लगेच गौरीच्या घरी पोहचते आणि तिथे संजना अरुंधतीला म्हणते का माझ्या संसारात आणि घरात लुडबूड करते. त्यावर अरुंधती संजनाला सडेतोड उत्तर देत म्हणते मला घरात येण्यापासून कोणीही अडवायचे नाही.माझी मुले या घरात राहतात त्यामुळे मला या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. त्यानंतर संजना तिथून निघून जाते. हे दाखवण्यात आले आहे.