'नवरी मिळे हिटलरला' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेत फाल्गुनी ही भूमिका अभिनेत्री धनश्री भालेकर साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच धनश्रीच्या आईचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनश्रीने ही माहिती चाहत्यांना दिली होती. आईच्या निधनानंतर आता पुन्हा धनश्री भावुक झाली आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत आईसाठी पोस्ट लिहिली आहे.
धनश्रीची भावुक पोस्ट
आई ❤️ अश्या अनेक गोड आठवणींचा खजिना आहे माझ्याजवळ माझ्या phone galleryमध्ये. प्रत्येक फोटो पाहताना त्याची एक वेगळी story आठवते. पर्यायाने पुन्हा एक नवीन आठवण.
त्यादिवशी बाराव्या दिवशीच्या पूजेसाठी तुझा photo frame करून आणला तेव्हा एकदम जाणवलं की एखाद्याचं पूर्ण आयुष्य एका फोटोपूरतं सीमित होऊन जातं. यापेक्षा भयंकर होता तो दहाव्या दिवशी आलेला अनुभव. पूजा विधी झाल्यानंतर, अस्थी विसर्जन करण्यासाठी त्या पुन्हा भरताना जेव्हा ती हाडं माझ्या हाताला लागली तेव्हा एकदम अंगावर शहारे आले...आणि जाणवलं की मुलांनी आपल्या पालकांचे अस्थी विसर्जन किंवा स्पर्श होणं किती भीषण वास्तव आहे. पण त्यानंतर अगदी पाचव्या सेकंदाला जेव्हा कावळा पिंडाला शिवला आणि गुरुजी म्हणाले की पुण्यवान होती तुमची आई आणि शांततेत गेली. तेव्हा वाटलं खरंच आहे. तू नेहमीच म्हणायची की मरण स्वतः स्वीकारता यावं आणि तू त्याचे ही काटेकोर पालन केलेस. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हसून गप्पा मारत गेलीस पण तरी मला अजूनही असंच वाटतं आई की जरा घाई केलीस.
इतक्या गोष्टी मी बोलत असते तुझ्याशी पण तू उत्तर देत नाही हल्ली, स्वप्नात येऊन गप्पा मारत बसतेस. हो.....य !
मला माहिती आहे आई, मी असं घरी बसून राहणं तुला अजिबात आवडत नाही. कधीच आवडायचं नाही...सुरू करणार आहे पुन्हा काम, थोडा माझा माझा वेळ घेत होते.आता तर तुझं स्वप्नं पूर्ण करणं हे ध्येय आहे. actually, आपलं दोघींचं स्वप्नं... म्हणजे तू आहेस तिथे तुला माझा अभिमान वाटेल I promise आई. पण आता हे सगळं तुझ्याशिवाय करायचं आहे त्यामुळे मला tension आलं आहे म्हणून तू तुझा आशर्वाद सतत माझ्या पाठीशी ठेव.
एकटं एकटं वाटतंय, actually खूप एकटं वाटतंय, खूप आठवण येते, एकदम रिकामी झाल्यासारखं, एकटी पडले आहे गं...पण आपण स्वप्नात गप्पा मारत राहू. कारण, तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस पूर्ण झाल्यासारखा नाही वाटत मला.
धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत ती झळकली होती. 'हे मन बावरे' या मालिकेतही तिने काम केलं आहे. याबरोबरच 'मेरे साई', 'त्रिदेविया' या हिंदी मालिकांमध्येही ती दिसली होती.