Join us

VIDEO: 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा डाव; कलाकारांनी केली धमाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:11 IST

'नवरी मिळे हिटलरला' ही (Navri Mile Hitlarla) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे.

Vallari Viraj Share Video: 'नवरी मिळे हिटलरला' ही (Navri Mile Hitlarla) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकार सुद्धा प्रेक्षकांचे आवडते आहेत. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेची लोकप्रियता आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट अभिराम उर्फ एजेची भूमिका साकारतो आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज 'लीला' च्या भूमिकेत दिसते आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील एजे-लीलाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, या मालिकेमधील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सेटवरील वेगवेगळे मजेशीर व्हिडीओ शेअर करत ते आपल्या चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात. 

नुकताच अभिनेत्री वल्लरी विराजने 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेच्या सेटवरील खास व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. हा व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार सेटवर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. प्रत्येकजण क्रिकेट खेळत धमाल करत आहे. वल्लरीने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओमध्ये भूमिजा पाटील गोलंदाजी करते आहेत तर अभिनेत्री भारती पाटील फलंदाजी करत आहेत. तर वल्लरी स्वत: मागे खूर्चीवर बसून क्रिकेटचा आनंद लूटते आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील खुश झाल्याचे पाहायला मिळतायत.

दरम्यान, 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होते. २२ मार्च २०२४  मध्ये ही सुरु झाली. त्यानंतर अल्पावधीत मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसोशल मीडिया