Join us

​निया शर्मानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्मा फेम भाव्या गांधीचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2017 5:06 AM

निया शर्मा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो पोस्ट करत असते. तिच्या हॉट फोटोंची तर चांगलीच चर्चा असते. निया ...

निया शर्मा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो पोस्ट करत असते. तिच्या हॉट फोटोंची तर चांगलीच चर्चा असते. निया इन्स्टाग्रामला चांगलीच अॅक्टिव्ह असल्याने तिला इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. पण नुकतेच तिचे अकाऊंट हॅक झाल्याने ती प्रचंड दुःखी आहे. नियाने याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली आहे. तिचे अकाऊंट हॅक झाल्यामुळे तिला फोटो पोस्ट करता येत नाहीये. त्यामुळे माझा एखादा अवयव निकामी झाल्यासारखे वाटत असल्याचे ट्वीट तिने नुकतेच केले आहे.नियाने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर केवळ एका दिवसांत आणखी एका सेलिब्रेटीने इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत भाव्या गांधी टप्पू ही भूमिका साकारत होता. त्याने काहीच दिवसांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला आहे. सध्या तो त्याच्या गुजराती चित्रपटाच्या चित्रीकऱणात व्यग्र आहे. भाव्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असल्याची त्याने नुकतीच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याविषयी भाव्याची आई सांगते, "गेल्या चार दिवसांपासून काही केल्या भाव्या त्याचे अकाऊंट अॅक्सेस करू शकत नव्हता. त्याचे अकाऊंट हॅक झाले असेल याची त्याला कल्पनादेखील नव्हती. त्याच्या काही मित्रांना त्याच्या अकाऊंटवरील पोस्टमुळे संशय आल्याने त्यांनी भाव्याला याबाबत कळवले. हॅकर अनेक इमेल-आयडीवरून हे अकाऊंट ऑपरेट करत आहे असे आम्हाला पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच हॅकर हा ओळखीतला असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. हॅकर मिळाल्यानंतरच त्याचा अकाऊंट हॅक करण्यामागचा उद्देश काय आहे हे आम्हाला कळेल. पण याचा भाव्याला चांगलाच मानसिक त्रास झाला आहे."