मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:56 PM2018-08-14T13:56:15+5:302018-08-14T13:58:40+5:30

'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते.

Nazar Fame Actress Ritu Sheth wards off evil eye whenever her daughter falls sick | मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट

मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका'नजर' मालिकेत रितू सेठने साकारलीय वेदश्रीची भूमिका

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रितू सेठ स्टार प्लस वाहिनीवरील 'नजर' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारते आहे. या मालिकेत ती वेदश्री ही भूमिका साकारीत असून ती आपल्या मुलाचे सर्व वाईट दृष्टीपासून रक्षण करण्यासाठी धडपडत असते. रितू सेठ खऱ्या आयुष्यातही एक आई असून इतर आईंप्रमाणे तिचाही दृष्ट लागण्यावर विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिची मुलगी आजारी पडते तेव्हा ती तिची दृष्ट काढायला विसरत नाही. 


'नजर' या मालिकेसाठी चित्रीकरणास सुरूवात केल्यापासून ही अभिनेत्री वाईट जरा आणि दृष्ट शक्तींबद्दल अधिक सजग बनली आहे. रितू सांगते, “इव्हाना हेच माझे विश्व असून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी मी काहीही करीन. नजर मालिकेसाठी मी चित्रीकरण सुरू केल्यापासून माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या भोवती काही दुष्ट आणि काही सुष्ट शक्ती सदैव घोंघावत असतात. आता इव्हाना जेव्हा जेव्हा आजारी पडते, तेव्हा मी घाबरून जाते आणि तिची मी दृष्ट काढते. त्यामुळे ती झटपट सुधारते.”
'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे. 'नजर' या मालिकेत  रितू सेठ सोबतच मोनालिसा, स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Nazar Fame Actress Ritu Sheth wards off evil eye whenever her daughter falls sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर