Join us

नीना गुप्ता यांनी सांगितले, कठीण काळात केवळ हीच व्यक्ती राहिली माझ्या पाठिशी उभी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 06:30 IST

इंडियन आयडल या कार्यक्रमात नीना गुप्ता यांनी ही गोष्ट सांगितली.

ठळक मुद्देनीना यांनी सांगितले, माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर मला थोडी भीती वाटली होती की, मीच तिची आई वडील दोन्ही असल्याने तिला कसे वाढवावे. परंतु या सगळ्यात माझे वडील माझ्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनी माझ्या मुलीचा सांभाळ करण्यास मला मदत केली.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या आगामी भागात शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे. या चित्रपटातील कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच या कार्यक्रमातील स्पर्धकांचा उत्साह वाढवणार आहेत. 

इंडियन आयडलचा स्पर्धक रोहित राऊतने बेखयाली, सद्दा हक, जय जय शिव शंकर अशी विविध गाणी सादर केली. नीना गुप्ता यांना रोहितचा आवाज प्रचंड आवडला. त्यांनी रोहितच्या आवाजाचे कौतुक करत असतानाच त्याच्या वडिलांचे देखील कौतुक केले.  रोहितच्या वडिलांप्रमाणेच त्याही एकट्या पालक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर मला थोडी भीती वाटली होती की, मीच तिची आई वडील दोन्ही असल्याने तिला कसे वाढवावे. परंतु या सगळ्यात माझे वडील माझ्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनी माझ्या मुलीचा सांभाळ करण्यास मला मदत केली. माझ्या अतिशय वाईट काळात माझे वडील माझ्या पाठिशी उभे राहिले असल्याने मी त्यांचे नेहमीच आभार मानते. 

या कार्यक्रमात आयुष्मान खुराणाने देखील सांगितले की, मी माझ्या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय असून मी याचे संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांना देतो.  22 आणि 23 फेब्रुवारीला प्रेक्षकांना इंडियन आयडल 11 चा फिनाले सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :नीना गुप्ताशुभ मंगल ज़्यादा सावधानइंडियन आयडॉलरोहित राऊत