Join us

Bigg Boss Marathi 3 : स्रेहा बेटा अब तेरा पत्ता कट..., नीथा शेट्टीच्या एन्ट्रीने चाहते झाले ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:20 IST

Bigg Boss Marathi 3 : हिचे रूप पाहता भल्याभल्यांच्या हृदयात वाजते शिट्टी, बिग बॉसच्या घरात नीथा शेट्टी....

बिग बॉस मराठी 3’च्या ( Bigg Boss Marathi 3) घरात नवी एन्ट्री झालीये. होय, अभिनेत्री नीथा शेट्टी-साळवी (Neetha Shetty Salvi) हिने बिग बॉस मराठीच्या घरात दणक्यात एन्ट्री घेतली आणि तिच्या येण्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याच्या भुवया उंचावल्या. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर नीथा शेट्टीच्या बिग बॉस मराठीच्या घरातील धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Neetha Shetty Salvi wild card entry in bigg boss marathi 3 ) ‘हिचे रूप पाहता भल्याभल्यांच्या हृदयात वाजते शिट्टी, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करतेय नीथा शेट्टी....,’ अशा कॅप्शनसह नीथा बिग बॉसच्या मंचावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिच्या या व्हिडीओवर आणि एकूणच तिच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

होय, आता स्रेहाला सोडून जय दुधाणे हिच्या पाठी लागणार, तेरा पत्ता कट स्रेहा, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.  आता ही विशालबरोबर जास्त बोलायला हवी, मग मजा बघा सोनालीची, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सारंगीचा मेकअप आता नीतूच्या येण्याने 100 टक्के उतरणार, असे म्हणत एका चाहत्याने स्रेहाला लक्ष्य केलं आहे.ही विशालच्या टीमसोबत खेळली तर मग लय भारी काम होईल... प्लीज, नीथा नीट खेळ गं. आदिशनंतर तूच सावरून शकते त्या टीमला. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे. दिलखेचक अदा, रापचिक नटी, आली रे आली नीतू..., आता मजा येणार असं वाटतंय, खूप भारी आयटम आहे ही सावधान इंडिया..., अशा भन्नाट कमेंटही काहींनी केल्या आहेत.एकंदर काय तर नीतूच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीचे प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. नीतू बिग बॉसच्या घरात कशी मजा आणते, हे पाहायला चाहते उत्सुक आहेत.

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे आलेली नीथा शेट्टी ही मराठी आणि हिंदीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेनाली रमण, घरी की लक्ष्मी बेटियाँ, परावतार श्री कृष्ण अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक मालिकांमध्ये सोज्वळ भूमिका  साकारणाऱ्या नीथाने  Gandii Baat 4 मध्ये प्रचंड बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये काम करण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती.नीथाने आतापर्यंत २९ मालिका आणि चारपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच तिने ओटीटीवरही पदार्पण केलं असून काही वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीस्रेहा वाघ