Join us

'बानी इश्क दा कलमा' फेम अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:54 IST

अभिनेत्रीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मेरे दिल की लाइफलाइन, पिया रंगरेझ आणि बनी इश्क दा कलमा यांसारख्या शोमध्ये काम केलेली अभिनेत्री नेहा बग्गा सध्या टीव्हीच्या दुनियेपासून दूर आहे. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  अभिनेत्रीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत.  

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना नेहा बग्गाने लिहिले, कायमचे 9.11.23. यासोबतच हार्ट इमोजी शेअर करण्यात आले आहेत. ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी आणि सेलिब्रेटींनी अभिनंदन केलं आहे. नेहानेने तिचा बॉयफ्रेंड रेस्टी कंबोजसोबत लग्न केलं आहे. शिमलामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थिती त्यांनी सातफेरे घेतले. 

लग्नात नेहाने पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान केला आहे तर रेस्टीने व्हाइट कलरची शेरवानी घातली आहे. नेहा आणि रेस्टीची जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दोघेही इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करतात. सोशल मीडियावर दोघेही स्टार आहेत. नेहाचा पती रेस्टी हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकार