Join us

रोडीजच्या सेटवरच नेहा धुपिया चक्कर येऊन पडली, आता कशी आहे तब्येत? दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:34 IST

नेहा रोडिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगदरम्यानच रोडिजच्या सेटवर नेहा चक्कर येऊन पडली होती. यामुळे तिचे चाहते चिंतेत होते.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या नेहा रोडिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगदरम्यानच रोडिजच्या सेटवर नेहा चक्कर येऊन पडली होती. यामुळे तिचे चाहते चिंतेत होते. आता याबाबत नेहाने माहिती देत तिचे हेल्थ अपडेट शेअर केले आहेत. 

एमटीव्हीवर प्रसारित होणारा रोडिज हा लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शोमध्ये रणविजय, प्रिंस नरुला, एल्विश यादव, रिया चक्रवती आणि नेहा धुपिया परिक्षक आहेत. या शोच्या शूटिंगदरम्यान सेटवरच तब्येत बिघडल्याने नेहाला चक्कर आली होती. आता तिने हेल्थ अपडेट देत काळजी करण्याचं कारण नसल्याचं चाहत्यांना म्हटलं आहे. "एक छोटासा प्रॉब्लेम होता. पण, आता मी एकदम फिट आहे आणि माझ्या पायांवर उभी राहू शकते. पहिल्यासारखीच मी एनर्जेटिकदेखील आहे", असं नेहाने सांगितलं आहे. 

तब्येत बिघडल्यानंतरही नेहा शूटिंग करत होती. तिने शूटिंग थांबवलं नाही. या शोमध्ये नेहा गँग लीडर आहे. चार वर्षांनी ती रोडिजमध्ये पुन्हा परतली आहे. त्यामुळे या कामासाठी ती तिचे १०० टक्के देत आहे.  

टॅग्स :नेहा धुपियाएमटीव्ही