Join us

VIDEO : नेहा कक्करने नकळत खाल्ली कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी आणि......

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 10:46 AM

नेहा कक्करसाठी ही पाणीपुरी हिमेश रेशमिया घेऊन येतात. अशात ती पाणीपुरी बघून स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. ती लगेच एक पाणीपुरी खाते आणि लगेच थुंकते.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या इंडियन आयडलच्या जजच्या रूपात दिसत आहे. इंडियन आयडलच्या सेटवर नेहा मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सध्या नेहाचा या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती सेटवर पाणीपुरी खाताना दिसत आहे. पण त्यात एक ट्विस्ट आहे. ती पाणीपुरी खाते आणि लगेच थुंकते. नेहाचा हा व्हिडीओ तिच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.

नेहा कक्करसाठी ही पाणीपुरी हिमेश रेशमिया घेऊन येतात. अशात ती पाणीपुरी बघून स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. ती लगेच एक पाणीपुरी खाते आणि लगेच थुंकते. त्यानंतर वेडंवाकडं तोंड करायला लागते. नेहा तेव्हा म्हणते की, पाणीपुरी कडु आहे. यावर हिमेश म्हणतो की, मी ते फिटनेसच्या हिशेबाने बनवलं आहे. दुसरीकडे विशाल ददलानी सांगतो की, यात कारल्याचा आणि कडुलिंबाचा ज्यूस आहे.

नेहा कक्करची ही हालत बघून विशाल ददलानीला हसू आवरत नाही. नेहाच्या या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. सोबतच लोकांना नेहाचे एक्सप्रेशन बघून जोरदार हसू येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, नेहा कक्करचं  'भाभी' हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं 'कुली नंबर १'सिनेमातील आहे.   

 

टॅग्स :नेहा कक्करटेलिव्हिजनसोशल व्हायरल