Join us

"लायकी नसताना..."; मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, पण नेटकऱ्यांनी का केलं तिला ट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:27 IST

शिवजयंतीला लिहिलेल्या पोस्टवरून मराठी अभिनेत्री ट्रोल, काय म्हणाली होती ?

मुघलांना सळोकीपळो करून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची काल १९ फेब्रुवारी रोजी ३९५ वी जयंती मोठ्या थाटात साजरी झाली.  केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्साह लोकांमध्ये दिसून आला. महाराजांची जयंती म्हटल्यावर मराठी  कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून 'शिवजयंती'च्या शुभेच्छा पोस्टच्या माध्यमातून देताना दिसतात. अभिनेत्री नेहा शितोळे हिने काल 'शिवजयंती'निमित्ताने परखड मंत मांडत शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली होती. पण, तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.  

 नेहा शितोळेनं काल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. तिनं लिहलं, "एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या पण आज फेटे बांधून, नऊवारी साडी नेसून, लायकी नसनाताही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा ( ओरडत, ओरबाडत ) नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉनचे कर्कश्य आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथट करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना". 

नेहा शितोळेने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तिला ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने नेहाला तिचा नवरा दुसरं लग्न करेल असा शाप दिलाय. याचा स्क्रीनशॉर्ट नेहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. नेटकऱ्यानं लिहलं, "माझी कमेंट डिलीट का केली? शाप आहे माझा, तुझा चढता काळ कधीच येणार नाही. तू तणावात राहशील, नचिकेत दुसरं लग्न करेल. बघ तू". यावर नेहानं म्हटलं, "माझ्या कालच्या वक्तव्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया येणार हे माहिती होतं. त्याचाच एक नमुना…ट्रोल करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावं हे सल्ले खूप मित्र, आप्तेष्ट आणि हितचिंतक देतात जे योग्य सुद्धा आहे. म्हणून या महाशयाची कमेंट मी डिलिट केली. पण यांना ब्लॉक करायला विसरले. हा शाप मला लागेल का खरंच? आता यांना रिपोर्ट करणं आलं".

नेहा शितोळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं साऊथचा गाजलेला सिनेमा 'कल्कि २८९८ एडी'मधील कमल हासन यांचे संवाद लिहिले आहेत. याआधी तिनं 'सीता रामम' साठी संवादलेखनाची जबाबदारी निभावली आहे. 'सीता रामम' सिनेमाचे हिंदीतील सर्व डायलॉग नेहा शितोळेने लिहिले आहेत. केवळ ५ दिवसात या सिनेमासाठी काव्यात्मक हिंदी संवाद लिहिण्याची मोठी जबाबदारी नेहाने सांभाळली. अशाप्रकारे अभिनय करण्यासोबतच साऊथ सिनेमांच्या हिंदी संवादांची महत्वाची जबाबदारी नेहा शितोळे निभावत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात नेहाने खिलाडूवृत्ती अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे ती अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

टॅग्स :नेहा शितोळेछत्रपती शिवाजी महाराज