बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. हे कार्य सदस्यांसाठी खूप महत्वाचे आहे कारण या कार्याचा सदस्यांना कॅप्टनसीसाठी मोठा फायदा होणार आहे. काल वैशाली या कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे... तर या टास्क मध्ये सदस्य दुसऱ्या टीमच्या सदस्यांसोबत योजना आखत आहेत जेणेकरून त्यांना कॅप्टनसीसाठी मदत होईल. परंतु प्रत्येक टीममध्ये ठरलेले आहे कि, दुसऱ्या टीममधील कोण कोणत्या सदस्यांना या आठवड्यातील कॅप्टनसी पासून दूर ठेवायचे आहे. ज्यामध्ये अभिजीत, वीणा, वैशाली, शिव यांचे म्हणणे आहे हिना आणि नेहा त्या स्पर्धेत नको, तर माधवच्या टीमचे म्हणणे आहे वीणा आणि वैशाली नको. ज्यामधून वैशाली कालच बाहेर पडली आहे. नेहाने काल माधवला सांगितले वैशाली बाहेर गेली आहे आता अभिजीतचा नंबर. पण यावर माधवचे म्हणणे आहे अभिजीत हुशार आहे तो कोणाबरोबर तरी डील करणारच... आता बघूया अखेर कोणता सदस्य सेफमध्ये जाईल ? आणि कोणाला माधवची टीम जाण्यापासून थांबवू शकेल.
आज नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करत आहे कि, काल मी तुला मदत केली आज तू पण कर. नेहाचे म्हणणे आहे “माझी बाहुली जर सापडली तर त्याला कोणी हात नाही लावायचा. शिव म्हणाला हि डीलच नव्हती. त्यावर नेहा म्हणाली मी तुला आता नवीन डील देते आहे. पण कालच अभिजीत आणि टीमचे ठरले आहे आता कुठलीही नवी डील नेहसोबत करायची नाही. शिव नेहाला म्हणाला जर हि दुसरी डील असेल तर मला काय मिळेल त्याच्या बदल्यात यावर नेहाने शिवला काहीच उत्तर नाही दिले... पण नेहाचे म्हणणे होते माझ्या बाहुलीला हात नाही लावायचा इतक तर तू करूच शकतोस. तू आणि अभिजीतने देखील हात नाही लावायचा. शिवने याला मंजुरी दिली आहे पण बघूया पुढे काय होते. आता शिवचा निर्णय काय असेल ? तो अभिजीत, वीणा वैशालीशी याबाबतीत बोलेल का ? हे आज कळेलच.