Join us

बिग बॉसच्या घरातही नेपोटिझमचा मुद्दा पेटला, याविषयी सलमान खान म्हणाला.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 11:52 AM

'वीकेंड का वार' या आगामी एपिसोड मध्ये सलमान खान या विषयावर चर्चा करताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या एपिसोड मध्ये, स्पर्धक राहुल वैद्यने जान कुमार सानूला नेपोटिझमचे प्रॉड्क्ट असे नाव दिले आणि त्याला सांगीतल की त्याचे वडील कुमार सानू यांच्यामुळेच तो शोमध्ये सहभागी होवू शकला. ही गोष्ट स्पर्धकांना अजिबात आवडली नाही. जॉनने सुध्दा स्पष्ट केले की त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच वेगळे झालेले आहेत आणि त्याला त्याच्या आईने वाढवले आहे, त्यामुळे यात नेपोटिझमचा प्रश्नच येत नाही.'वीकेंड का वार' या आगामी एपिसोड मध्ये सलमान खान या विषयावर चर्चा करताना दिसणार आहे.

 त्याने राहुल वैद्यला त्याच्या विधानांसाठी प्रश्न विचारला आणि स्पष्ट केले की तो चुकीचा आहे आणि त्याने हे शब्द वापरायला नको होते. सलमानने सांगीतले की एखाद्या पालकांनी जर त्यांच्या मुलांसाठी काही केले असेल त्याला नेमोटिझमचे लेबल लावणे चुकीचे आहे. त्याने पुढे सांगीतले की जान नेपोटिझम मुळे गायक बनला असेल तर मग तो राहुल पेक्षा जास्त यशस्वी असायला हवा होता.

त्याने राहुलला प्रश्न विचारला की त्याच्या मुलांनी जर गायन हा व्यवसाय निवडला तर तो त्याला सुध्दा नेपोटिझम म्हणेल का? सलमान राहुलवर खूप नाराज झाला आणि त्याने नेपोटिझमचा तीव्र निषेध केला. तो पुढे म्हणाला की इंडस्ट्रीमधील कोणीही त्यांच्या मुलांवर कशाचीही सक्ती करू शकत नाही. 

जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले -

बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा लहान मुलगा जान कुमार सानू टीव्हीवरील सर्वात चर्चीत रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' च्या घरात स्पर्धक म्हणून आहे. जानने एका एपिसोडदरम्यान निक्की तांबोळी आण राहुल वैद्यला मराठी बोलण्यास मनाई केली होती. जान निक्कीला म्हणाला होता की, मराठीत बोलू नको मला चिड येते. ही बाब काही लोकांना आवडली नाही. मनसेने यावर माफीची मागणी केली होती. नंतर जानने माफीही मागितली होती.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस