Join us

कधीकाळी जेठालालला एका भागासाठी मिळायचे ५० रुपये, आज आहे इतक्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 4:31 PM

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेती मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीसाठी करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेती मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीसाठी करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत.

 

कधीकाळी या अभिनेत्याला एका भागासाठी फक्त ५० रू. मिळायचे. . आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे दिलीप जोशी यांनी करिअरच्या सुरुवातीस प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना केला होता.मात्र तरीही हार मानली नाही. आपले काम सुरू ठेवले. आज दिलिप जोशी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत गणले जातात.

म्हणूनच तारक मेहता मालिकेसाठी दिलीप जोशीला सर्वाधिक रक्कम मानधन म्हणून मिळते. मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1. 5 लाख रू. इतके मानधन दिलीप जोशी यांना मिळते. दिलीप जोशी म्हणजेच सगळ्यांचे लाडके जेठालाल महिन्यात सुमारे 25 दिवस शूट करतात. अशा प्रकारे त्यांचा एक महिन्याचा पगार 36 लाखाहून अधिक आहे.

दिलीप जोशी मुळचे गुजरातचे आहेत. 1997 मध्ये त्यांनी 'कर बात है' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 1989 मध्ये 'मैंने प्यार किया' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

यानंतर दिलीपने बॉलिवूडच्या 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'हमराज', 'दिल है तुम्हारा' या सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमध्ये फारसे यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा टीव्हीकडे वळावे लागले आणि तारक मेहता का उल्टा चष्मा माालिकेनेच पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. 

अनेक एपिसोड कॉमेडीच्या लेव्हलचे नाही' 

दिलीप जोशी म्हणाले की, 'आता रोज रायटर्सना नवा विषय शोधावा लागतो. अखेर ते सुद्धा माणसं आहेत. मला असं वाटतं की, जेव्हा तुम्ही असा शो रोज करत आहात तर सर्वच एपिसोड एकाच लेव्हलचे होऊ शकत नाहीत. कॉमेडीबाबत म्हणाल तर काही एपिसोड्स आहेत जे त्या लेव्हलचे नाही'. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आता एक फॅक्टरी झाली आहे. ज्यात रायटर्सना रोज एपिसोड लिहावे लागतात आणि नवे विषय शोधावे लाग

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा