Join us

छोट्या पडद्यावरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:57 IST

Tv serial: काही मालिका पहिल्या भागापासून हिट होतात. तर, काही मालिका कितीही प्रयत्न केला तरी फारशा लोकप्रिय होत नाही.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे रोजच प्रेक्षकांसमोर मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात काही मालिका पहिल्या भागापासून हिट होतात. तर, काही मालिका कितीही प्रयत्न केला तरी फारशा लोकप्रिय होत नाही. यात सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासोबतच काही मालिका प्रेक्षकांचा निरोपही घेत आहेत. अशामध्येच एक लोकप्रिय ठरलेली मालिका अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेली अजूनही बरसात आहे ही मालिका अलिकडेच सुरु झाली होती. मात्र, आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यानुसार, येत्या १२ मार्चला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण करताना मालिकेतील कलाकार भावुक झाले होते.

दरम्यान, ही मालिका अलिकडेच सुरु झाली होती. मात्र, काही कारणास्तव ती अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारउमेश कामतमुक्ता बर्वे