'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हणतात, आपल्यात असणाऱ्या नृत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध छोट्या पडद्यावर घेतला जाणार आहे.
अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकर आणि कथाविस्तारावर भर देणारे रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते, यंग्राड, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा चित्रपटांची कोरियोग्राफी करणारे विठ्ठल पाटील. ते डान्सच टेक्निक, स्टाइल याबाबत ते मुलांच परीक्षण आणि मार्गदर्शन करतील, ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.
आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांचा गुलदस्ता देऊ करणारे सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिअॅलिटी शोचा भाग होणार आहेत. असा हरहुन्नरी दिग्दर्शक महाराष्ट्रात सापडणाऱ्या छोट्या उस्तादांच्या कलेचं मूल्यमापन करणार म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले हिरे प्रेक्षकांसमोर येतील आणि डान्स चा सर्वात मोठा स्टेज - जिथे डान्सर बनतील सुपर डान्सर हा वाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम जणू नृत्य प्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच ठरेल यात शंका नाही.
सगळ्यांतच एक पाऊल पुढे असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोड्यातून या छोट्या नृत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोट्या कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱ्या या त्रयीचं परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.
वेगळेपण जपण्याची परंपरा कायम ठेवत सोनी मराठीने आता छोट्या उस्तादांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सुंदर त्रयी रंगमंचावर बसवली आहे. परीक्षक मंडळावर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील यांच्यावर 'सुपर डान्सर महाराष्ट्र' शोधण्यासाठीची जबाबदारी सोनी मराठीनी सोपवली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे.