बिग बॉस मराठी सिझन 2 च्या अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांनी आपले स्थान निश्चित आहे. या कार्यात नेहाला ९ पैकी ८ आणि शिवानीला ९ पैकी ५ मत मिळवून फिनालेमध्ये पोहोचल्या आहेत. सिझन2 चे हे शेवटचे नॉमिनेशन कार्य आहे अशी घोषणा बिग बॉस यांनी केली यानंतर सगळेच सदस्य भावुक झाले. या आठवड्यात आरोह, किशोरी, वीणा आणि शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत, पण मतदान प्रक्रिया बंद आहेत.. बघूया पुढे काय होते ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस सदस्यांवर एक नवे कार्य सोपवणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक सदस्याला या स्पर्धेतील स्वत:चे मूल्य दिलेल्या मुद्रांमधून ठरवायचे आहे. परंतु शेवटचे मूल्य हे सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठरवायचे आहे. आता हे ठरवताना सदस्यांमध्ये वाद विवाद होणार हे निश्चित..
या कार्यामध्ये किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी स्वत:चे मूल्य ६ लाख इतके सांगितले आहे... पुढे टास्क मध्ये काय होईल ? हे बघणे रंजक असणार आहे..