Join us

बापमाणूस या मालिकेत सूर्यासमोर उलगडणार हे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 3:22 PM

आबासाहेबांच्या सत्तेसाठी कुटुंबियांची चाललेली चढाओढ प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे. घरातील अनेकांना निशावर संशय असल्याचं आपल्याला मालिकेत दाखवण्यात आले आहे.

रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. बापमाणूस या मालिकेत सुयश टिळक, पल्लवी पाटील यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा भावत आहेत.

झी युवा वाहिनीवरील 'बापमाणूस' मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला.

आबासाहेबांच्या सत्तेसाठी कुटुंबियांची चाललेली चढाओढ प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे. घरातील अनेकांना निशावर संशय असल्याचं आपल्याला मालिकेत दाखवण्यात आले आहे.

बापमाणूस या मालिकेत पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदत मागायला आलेली मुलं अचानक गायब झाली आहेत आणि त्यांना शोधायची जबाबदारी सूर्याने घेतली आहे. आईसाहेब त्या मुलांना शोधून काढायला केवळ काही दिवसांची मुदत सूर्याला देणार आहे. ती मुदत संपत आलेली असताना सूर्या हा आबासाहेबांच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी कसा योग्य नाहीये हे पटवून द्यायचा प्रयत्न निशा आईसाहेबांना करत आहे. त्या खुर्चीवर बसायचा मान तिला मिळावा असे ती त्यांना सांगणार आहे. पण इतक्यात सूर्या हरवलेल्या त्या मुलांसोबत तिथे येणार असून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करणार आहे आणि या मुलांच्या गायब होण्यामागे निशाचा हात होता अशी शंका सूर्याला येणार आहे. त्याच्यासमोर घडलेल्या काही गोष्टींमुळे त्याची शंका सत्यात उतरणार असून निशाचा खरा चेहरा सूर्या समोर येणार आहे आणि विशेष म्हणजे निशा हे सर्व सत्तेसाठी आणि बाबासाहेबांची खुर्ची बळकावण्यासाठी करत असल्याची कबुली देणार आहे. 

आबासाहेंबाच्या खुर्चीवर निशा बसणार की सूर्या? निशाचा खरा चेहरा सूर्या सगळ्यांसमोर आणणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेच्या येत्या काही भागात मिळणार आहेत. 

टॅग्स :सुयश टिळक