कलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्याच आठवड्यापासून मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये संत बाळूमामा यांची भूमिका साकारणारा समर्थ, सुंदरा (बाळूमामांची आई) अंकिता, मयप्पा (बाळूमामाचे वडील) तसेच पंच – पंच बाई, देवऋषी या कलाकारांचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावतो आहे.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमध्ये प्रत्येक गोष्ट त्या काळाचा विचार करून करण्यात आली आहे. मग ते गाव असो वा कलाकारांची वेशभूषा असो वा दाग दागिने किंवा पोशाख सगळ्यावरच बारकाईने काम केलेले आहे आणि त्यामुळेच लोकांना ते पसंत देखील पडत आहे. कलाकार, कथा, अभिनय, शीर्षक गीत सगळ्यालाच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शीर्षक गीतामध्ये जवळपास ७० कलाकारांचा समावेश होता. तसेच संत बाळूमामा यांची भूमिका साकारणाऱ्या समर्थसाठी खास हैद्राबादहून फेटा मागविण्यात आला होता. या मालिकेच्या निमित्ताने संत बाळूमामांचे अनेक पैलू त्यांच्या भक्तांना पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळत आहे.
कलर्स मराठीवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका अनेक दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवाच्या रूपात देवीचे दर्शन झाले आहे... आता बाळू सत्यवला देवप्पापासून कसे वाचवेल? कसे दूर ठेवेल? हे बघणे रंजक असणार आहे. गावात अनेक रंजक घडामोडी घडत असून बाळूची गोष्ट सगळ्यांनाच भावतेय. हे सगळे घडत असतानाच गावावर एक नवं संकट चालून आले आहे. पिंगळा येऊन गावात काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत देतो. आता हे संकट काय आहे? ही देवप्पाचीच कुठली चाल तर नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
गावामध्ये पंचाच्या बायकोला म्हणजेच अक्काला वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत... आता हे आवाज कसले आहेत? पंचाच्या बायकोला हे आवाज का ऐकू येत आहेत? हे कुणालाच माहिती नाही. पंच आणि पंचाच्या बायकोला कुठल्या गोष्टीचा लोभ सुटला आहे? बाळू या दोघांना कुठल्याही गोष्टीचा लोभ ठेवू नका असे का निक्षून म्हणणार आहे... गावावर कुठले संकट येणार आहे... हे लोभाचे आमिष कुणाचा घात करणार? आणि बाळू या अघटितावर कशी मात करणार? हे बघणे रंजक असणार आहे. याआधीही देवाप्पाने पंचाला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे ही देवापाची खेळी आहे की, पिंगळाचं भाकित खरं ठरणार हे लवकरच कळेल...
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.