Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लक्ष्मी निवास'मध्ये नवा ट्विस्ट, मालिकेत या अभिनेत्रीची झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:21 IST

Lakshmi Niwas Serial : झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे. लक्ष्मी निवास यांच्या मुलाने स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला तर भावनालाही चांगल्या पगाराची नोकरी लागली. त्यात तिला सिद्धूचीही वेळोवेळी मदत मिळत आहे. सिद्धूच्या ओळखीने आनंदीचे शाळेत अॅडमिशन घेतले. अशातच आता मालिकेत आणखी एका पात्राची एन्ट्री झाली आहे. हे पात्र अभिनेत्री जान्हवी तांबट साकारणार आहे. 

लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी तांबट पूर्वीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत तिचा बालपणीचा मित्र सिद्धूसोबत साखरपुडा होणार आहे. एकीकडे सिद्धूचं भावनावर प्रेम आहे. मात्र भावना गाडेपाटीलला लग्न करायचे नसल्याचे सांगते. त्यामुळे आता भावनाला विसरुन सिद्धू पूर्वीला आपला जीवनसाथी बनणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

जान्हवी तांबट हिने या मालिकेअगोदर सोनी मराठीच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता लक्ष्मी निवास मालिकेत ती पूर्वीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

जान्हवी तांबट हिने २०२२ साली मिस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत तिने फर्स्ट रनरअपचा मान पटकावला. त्यानंतर घेतला वसा टाकू नको या झी मराठीच्या मालिकेत ती झळकली होती. संत गजानन शेगावीचे मालिकेतही ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.